नाशिकः अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक (Nashik) शाखतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा झालीय. त्यात 2022 चा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार डॉ. मोहन आगाशे, वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार संजय पवार (Sanjay Pawar) (Mohan Agashe) आणि बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार गिरीश सहदेव यांना जाहीर करण्यात आला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे यांनी ही माहिती दिली. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार आणि वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार 1998 पासून दिले जातात. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुस्काराचे स्वरूप आहे. बाबूराव सावंत पुरस्काराचे 11 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरूप आहे. हा पुरस्कार 2014 पासून दिला जातो. पुरस्कार निवड समितीमध्ये डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, शेफाली भुजबळ, रवींद्र ढवळे आणि ईश्वर जगताप यांचा समावेश होता.
आगाशेंचा गौरव
डॉ. मोहन आगाशे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून भूमिका केल्यात. त्यांनी अनेक नाटके केली आहेत. 1997 ते 2002 या काळात ते एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. आगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात त्यांनी मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे 1996 साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. आता त्यांचा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्काराने गौरव होणार आहे.
लवकरच कार्यक्रम
संजय पवार हे चित्रकार, जाहिरातकार, मराठी नाटककार, स्तंभलेखक, संवाद लेखक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी संवाद लेखन केले. त्यांचा सिंधूताई सपकाळ चित्रपट विशेष गाजला. त्याबद्दल त्यांना दोन पुरस्कार मिळआले. पवार यांना ठष्ट या नाटकाच्या लेखनासाठी मॅजेस्टिक प्रकाशनाचा विसाव्या वर्षीचा जयवंत दळवी पुरस्कार देण्यात आला. त्यांनी अनेक एकांकीकांचे लेखन केले. ते तिसर्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे पवार यांच्या एकांकिकांचा महोत्सवही भरवण्यात आला होता. गिरीश सहदेव यांचेही नाट्यसृष्टीसाठी मोठे योगदान आहे. कोरोनाचे निर्बंध कमी होत आहे. लवकर हा कार्यक्रम होऊन मान्यवरांचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात आली.
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग