लासलगाव : लासलगाव (Lasalgaon) येथे एक अपघाताची घटना घडलीयं. दोन मोटरसायकलच्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालायं. विंचूर रस्त्यावर मंजुळा पॅलेस समोर ही अपघाताची (Accident) घटना घडलीयं. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झालायं. जखमींवर सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार (Treatment) सुरूयंत.
दोन मोटरसायकल एकमेकांवर समोरासमोर जोरदार धडकल्या यात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडलीयं. रविवारी रात्री हा अपघात झालायं. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींवर लासलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले असून दोघेही गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते आहे.
या अपघातामध्ये श्रावण सोमनाथ पवार यांचा मृत्यू झालायं. श्रावण पवार हे लासलगांव जवळील विंचूर येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळतंय. मात्र, हा अपघात नेमका कसा झाला, हे अद्याप करू शकले नाहीयं. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपासास सुरूवात केलीयं. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना रात्रीच पुढील उपचासाठी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.