भाजप पुन्हा सत्तेत आली आणि नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले तर ते देशाचं संविधान बदलतील, अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जाते. या टीकेला भाजपच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दिंडोरीच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची जाहीर सभा झाली. या सभेत पंकजा मुंडे यांनी भाषण केलं. तेव्हा त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. कांदा प्रश्नावरही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही पंकजा मुंडे बोलत्या झाल्या. दिंडोरीतील नागरिकांना पंकजा मुंडे यांनी आवाहनही केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी चांगलं धोरण काढलं. यामुळे शेतकऱ्यांना कुणापुढे हात पसरवण्याची गरज राहणार नाही. समोरचे विरोधक घाबरवत आहेत. पण आमच्या सरकारच्या काळात मुस्लिमांना विविध योजनेचा लाभ मिळाला आहे. संविधानतील एक शब्द सुद्धा बदलण्याची मानसिकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाही, असं पंकजा मुंडे म्हणल्या.
आपल्या दिंडोरी मतदार संघातील उमेदवार भारतीताई पवार यांना निवडून द्या. सामान्य माणसाला एक चांगलं जीवन देणारा आपल्या पंतप्रधान यांना परत पंतप्रधान म्हणून निवडून द्यायचं आहे. 2014 च्या शौचालयं नव्हती. पण आता 100 टकके आहेत. शेतकरी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो, असं पंकजा मुंडे या सभेत म्हणाल्या.
स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांसोबत सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येत केली. अफवांवर विश्वास ठेवू नका… माझी काळजी करू नका… कांद्याचा विषय गंभीर आहे.. यावर कायमस्वरूपी मार्ग काढणं गरजेचेचं आहे. तो मार्ग आपलं सरकार काढेल. त्यासाठी आपली साथ गरजेची आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी देखील या सभेत भाषण केलं. त्यांनी पंकजा मुंडे भावी मंत्री म्हणून उल्लेख केला. मनमाडला दिलेली पाण्याची योजना लवकरच चालू होणार आहे. आमच्याकडे उद्योग आणावेत. आपण जे दिले आहे त्यामुळे मतदार संघात विकास कामे झाली आहेत. मनमाड शहरातील बायपास करून द्यावा. MIDC चे उद्योग आणून द्यावी. गिरणा उजवा कालवा, टाकली , मांजरे आणि नगाव हा कालवा मंजूर करावा. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होतील. नांदगाव तालुक्यातील पाण्यासाठी आवर्तन द्यावं, असं सुहास कांदे म्हणाले.