नाशिकः जिल्ह्यात भोंग्याबाबत आता नवे साहेब निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया गुरुवारी नाशिकहून (Nashik) बदली झालेले पोलीस आयुक्त (Commissioner) दीपक पांडेय यांनी दिली. राज्य सरकारने कालच पोलीस (Police) खात्यामध्ये अनेक फेरबदल केले आहेत. त्यात नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून व्हीआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची बदली केली आहे. तर पांडेय यांना मुंबई येथील महिला सुरक्षा विभाग प्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पांडेय यांच्या भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यात हेल्मटसक्तीचा केलेला अतिरेक. ते थेट काही दिवसांपूर्वी त्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांविरोधात फोडलेला लेटरबॉम्ब. यामुळे स्वतः महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नाराज झाले. त्यांनी पांडेय यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला. तर महसूल संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. या साऱ्या प्रकरणानंतर पांडेय यांनी बदलीची मागणी केल्याचे समोर आले होते. त्यानुसार त्यांची बदली झाली. पांडेय यांनी आज बदलीनंतर टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.
नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर भोंग्याबाबत घेतलेला निर्णयही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काहींनी त्यांचे कौतुक केले, तर हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध. या साऱ्या प्रकरणावर ते म्हणाले, भोंग्याबाबतचा निर्णय आता नवे साहेब घेतील. मी विसरुन जाणार आहे की, मी इथे आयुक्त होतो. मी मोकळा होतोय. त्यामुळे भोंग्याच्या निर्णयाबाबत आता मी काही बोलणार नाही.
पांडेय म्हणाले की, शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनात बदली ही नॉर्मल प्रक्रिया आहे. मीच 20-25 दिवसांपूर्वी व्यक्तिगत कारणास्तव बदलीसाठी अर्ज केला होता. सरकारने विनंती ऐकली. त्याबद्दल मी आभारी आहे. माझ्यावर आता अधिक मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे ते म्हणाले.
राणेंच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा, भोंगे किंवा हेल्मेटचा निर्णय यामुळे बदली झालीय का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, रुल ऑफ रॉ चे हे सर्व विषय एकदम सोपे विषय आहेत. माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. मी रुल ऑफ रॉ समोर ठेवूनच काम केले. आमच्या आदेशावर शासन आहे. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आहे. तिथे आमच्या आदेशाला आव्हान देता येऊ शकते. पण आम्ही शपथ घेतो की, आम्ही संविधानाच्या रक्षणाचे काम करणार आहोत. आमची जबाबदारी नागरिकांप्रती आहे. समाजाला काही फायदा होणार की नाही. मला एखाद्या आदेशाने समाधान वाटतेय की नाही, याचे ट्रेनिंगही दिलं जाते. मात्र, एक एक्स्झिक्युटिव पोस्टिंग झाल्यानंतर एक साइड पोस्टिंग झाली पाहिजे. त्यामुळे बॅटरी चार्ज होते.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!