योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 22 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. काहीच वेळात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाकडून नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती केली जाणार आहे. याआधी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. जय श्रीराम… आज अयोध्यात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. आम्ही इकडे काळाराम मंदिरात आरती करणार आहोत. 23 तारखेला शिवसेनेचे राज्य अधिवेशन होणार आहे. 2 हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. आज 12:30 वाजता ते ओझर विमानतळावर येणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही नाशिकला महाअधिवेशन घेत आहोत. याची सुरुवात नाशिकपासून करत आहोत. आजचा अयोध्येतील सोहळा मोठा आहे. आयोध्यात एक राजकीय इव्हेंट आहे. त्यामध्ये भाजपचा हात कुणीच धरु शकत नाही. भाजपने 2024 च्या निवडणुकीची तयारी केली आहे. आम्ही सांगू तसाच इन्व्हेंट करू असं भाजपने केलायय या सोहळ्याला चार शंकराचार्याचा विरोध होता, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदेंना सर्वात आधीच आम्ही आयोध्यात घेऊन गेलो होतो. त्याच यजमान पद नाशिककडे होतो. त्यावेळी ते पहिल्यांदाआम्ही घेऊन गेलो. ते आता जात आहेत काही हरकत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
आम्ही नाशिकमध्ये एक प्रदर्शन भरवत आहोत. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्मरणशक्तीला उजाळा देणार आहोत. त्यामुळे त्यांनी या प्रदर्शनाचे उदघाटन करावं अशी आमची इच्छा आहे. आम्ही आयोध्येला जाणार आहोत. मात्र त्याचा इव्हेंट करण्यासाठी नाही. सतरंज्यांवर झोपण्यासाठी नाही. तर आमच्याकडून गोरगरिबांना सतरंज्या वाटण्यासाठी जाणार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
आज सकाळी माझं वेणूगोपाल यांच्याशी बोलणं झालं आहे. राहुल गांधींच्या न्याय यात्रेवर हल्ला झाला आहे. भाजप सरकारच्या लोकांनी त्यावर हल्ला केला आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. राहुल गांधी आणि जयराम रमेश यांच्यावर गाडीवर हल्ला केला आहे. देशाची लोकशाही धोक्यात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.