योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नाशिक | 22 जानेवारी 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. कालपासून दोघेही एकमेकांवर शाब्दिक वार करत आहेत. आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांचा ‘शतमूर्ख’ असा उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या छायाचित्रकाराचा उल्लेख केला. ते नवभारतमध्ये कधीही काम करत नव्हते. तर ते लोकमत वृत्तपत्रात काम करत होते. त्या फोटोत देवेंद्र फडणवीस सदृश्य तरुण त्या गर्दीत दिसत आहे. फडणवीसांना मी मूर्ख म्हणणार नाही जरी. ते शतमूर्ख असतील तरी तसं मी म्हणणार नाही, त्यांनी कारसेवकांचा अपमान केलाय, असं म्हणत संजय राऊतांनी घणाघात केलाय.
राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला. कारसेवक जेव्हा अयोध्येला निघाले होते. तेव्हाचा नागपूर रेल्वे स्टेशनवरचा हा फोटो असल्याचं फडणवीस म्हणाले. त्यावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
जुनी आठवण…
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे…
नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.
जुनी आठवण…
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत… pic.twitter.com/v3NFbCSY1v— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2024
देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केले.असे प्रश्न विचारणं हे कोत्या आणि संकुचित वृत्तीचं लक्षण आहे. तुमचे लोक तिथून पळून गेले. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी स्विकारली. देवेंद्र फडणवीसांकडे नागपूरच्या स्टेशनवरचा फोटो आहे. आमच्याकडे घुमटावरचे फोटो, व्हीडिओ आहेत. तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर शाब्दिक हल्ला चढवला.
संजय राऊतांनी तुमच्या फोटोवर टीका केली आहे. यावर तुमचं काय मत आहे? असा प्रश्न पत्रकारांनी नागपुरात फडवीसांना विचारला. मी मुर्खांना उत्तर देत नाही, असं फजडणवीस म्हणाले. त्याला राऊतांनी आज पुन्हा प्रत्युत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस शतमूर्ख असले, तरी मी त्यांना तसं म्हणणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.