लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे चार टप्पे उरलेले आहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांना अंतिरिम जामीन मंजूर केला आहे. 1 जूनपर्यंत केजरीवाल जामीनावर आहेत. 2 जूनला त्यांना पुन्हा तिहार जेलमध्ये जावं लागणार आहे. त्यामुळे उरलेल्या चार टप्प्यांच्या प्रचारात अरविंद केजरीवाल दिसतील. याच सगळ्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोन झाला आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोन झाल्याचं राऊतांनी सांगितलं. त्यामुळे लोकसभा निवजडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला. जामीन देताना ईडीला फटकारलं आहे. केजरीवाल आता प्रचारात सहभागी होत आहेत. काल रात्री स्वतः उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे. 17 तारखेला मुंबईत होणाऱ्या सांगता सभेत अरविंद केजरीवाल येणार आहेत, त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
काही नेते आणि पक्षांची दखल घ्यावी, असं वाटत नाही.लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बस.तील तर बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या आत्म्याला किती त्रास होत असेल? याची कल्पना न केलेली बरी… अशा कुटुंबातील व्यक्ती त्यांच्यासोबत आहेत हे दुर्दैवी, असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
नरेंद्र मोदींच्या सभांवर संजय राऊतांनी टीका केली. मोठ्या प्रमाणात मोदी सभा घेत आहेत. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी यांच काही फायदा होत नाही. राज्यात आम्ही 35 ते 40 जागा आमही जिंकत आहोत. मोदी यांनी मुंबईत घर भाड्याने घ्यावे आम्ही त्यांना घेऊन देतो. 800 ते 900 कोटी रुपयांचे भूसंपादन घोटाळा झालेला आहे. 14 तारखेला मी यावर कागदपत्र सादर करून मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.