नाशिकच्या दिंडोरीत आज शरद पवारांच्या सभा झाली. नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात शरद पवार काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोस्कर यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा झाली. यावेळी नरहरी झिरवळ यांच्यावर शरद पवारांनी जोरदार निशाणा साधला आहे. 2019 चा पहाटेचा शपथविधी आणि सत्तास्थापनेच्या वेळचा एक किस्सा शरद पवारांनी सांगितला. झिरवाळ इथे आहेत ना… कोण झिरवाळ ना त्यांना टिकीट आम्ही दिले त्यांना सत्तेत आम्ही आणले. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष कोणाला करायचे मी सांगितले आदिवासी समाजाला नाशिक जिल्ह्याला… त्यांना उपाध्यक्ष केलं. त्यातील काही लोक पळून गेले सोडून गेले, असं शरद पवार म्हणाले.
दिल्लीला काही लोक पाठवले दिल्लीला नाही. गुडगावला हॉटेलला पाठवले आणि तिथे खोलीत आमच्या काही कार्यकर्त्यांना घुसायला सांगितलं. नरहरी झिरवळ तिथं सिनेमा बघत होते. महाराष्ट्र विधानसभेचे काम करण्यासाठी. हे सगळं काम सोडून हा ग्रस्त त्या ठिकाणी गुडगावला तिथून परत पाठवलं सांगितले परत चूक होणार नाही म्हटलं काही हरकत नाही, असं शरद पवार म्हणाले.
गरीब माणूस आहे. आदिवासी माणूस आहे चूक झाली असेल आपण पोटात घेऊया. पहिले 40-45 आमदार निघून गेले. त्याचे नेतृत्व शिंदेंनी केले आणि परत चाळीस गेले झिरवाळ पण गेले. लोकांनी सत्ता दिली अधिकार दिला. पण अशा माणसावर काही भरोसा ठेवायची गरज नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी झिरवाळांवर निशाना साधल्यानंतर आता नरहरी झिरवळ यांनी याला प्रत्युत्तर दिलं आहे.आम्ही सर्व एकत्र असताना त्यांनी उपाध्यक्ष केलं होतं. साहेबांनी नाही केलं असं मी म्हणणार नाही. हे सर्व करण्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा होता. परंतु राज्यातील सत्ता संघर्षाच्या घडामोडीच्या काळात पक्ष फुटीमध्ये मला माझं पद जाईल असं वाटलं होतं. पण तसं झाले नाही. फडणवीस शिंदे अजिददादांमुळे पद राहीलं. म्हणून मी आजच्या तळेघर येथील सभेत पवार साहेबांचं नाव घ्यायचं टाळलं, असं झिरवळ म्हणाले. ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील तळेघर इथं बोलत होते.