नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह रोजगाराची वाट पाहणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. आर्थिक डबघाईमुळे गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) अखेर सुरू होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता हा कारखाना नाशिक येथील प्रख्यात बिल्डर दीपक चंदे यांच्या दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संस्थेने चालवायला घेतला आहे. या संस्थेच्या निविदेला जिल्हा बँकेच्या प्रशासक सभेत मंजुरी देण्यात आली. त्याचे पत्रही सुपूर्द करण्यात आले. 2012 पासून पळसे येथे असलेला हा कारखाना बंद आहे. कारखान्याची मालमत्ता सध्या जिल्हा बँकेच्या ताब्यातय. हा कारखाना भाडेतत्वावर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी (Farmers) केली होती. त्यासाठी यापूर्वी निविदाही काढल्या होता. मात्र, त्यात यश आले नाही. बँकेने पुन्हा 3 मार्च रोजी निविदा काढली. त्याला प्रतिसाद मिळाला आणि आता कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
किती आहे गाळप क्षमता?
नाशिक सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 1250 मेट्रिक टन आहे. ही क्षमता वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे कारखान्याला ऊस जास्त लागेल. याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. शिवाय या कारखान्यामुळे किमान 5 हजार ऊसतोड कामगारांना रोजगाराची संधी जिल्ह्यातच मिळणाराय. शिवाय कारखान्यातही किमान पाचशे कामगार लागतील. याचाही मोठा फायदा होणार आहे.
कोणत्या भागाला लाभ?
नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यास त्याचा सर्वाधिक लाभ हा नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. सध्या या कारखान्याची सभासद संख्या तब्बल 17 हजार आहे. कामगारांची क्षमती ही 750 आहे. मात्र, कारखाना बंद असल्यामुळे सध्या केवळ 80 कामगार कामावर आहेत. त्यात आगामी काळात वाढ होईल. हा कारखाना एकूण 245 एकरात उभारला गेला आहे. या कारखान्याच्या क्षेत्रात किमान 6 हजार एकर ऊस लागवड क्षेत्र येते. या साऱ्या लाभधारकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
कसा आहे कारखाना?
गाळप क्षमता – 1250 मेट्रिक टन
सभासद संख्या – 17 हजार
कामगारांची क्षमता – 750
कारखाना परिसर – 245 एकर
ऊस लागवड क्षेत्र – 6 हजार एकर