नाशिक: आरटीओ विभागातील निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात परिवहन विभागातील पदोन्नतीमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली आहे. नाशिक पोलिसांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना क्लीन चिट दिल्यानं गजेंद्र पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक पोलिसांकडून अनिल परब यांना क्लीन चिट दिल्यानं दिलासा मिळाला होता. गजेंद्र पाटील यांनी पोलिसांच्या चौकशी अहवालावर समाधानी नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी तब्बल 12 जणांचा जवाब नोंदवला होता. (Nashik suspended RTO officer Gajendra Patil said after 45 days of enquiry crime not disclosed is shocking)
चौकशी अहवालावर मी समाधानी नाही, 15 मे रोजी नाशिकच्या पंचवटी पोलिसात तक्रार दिली होती. 45 दिवसानंतर कोणताही गुन्हा घडला नाही असं पोलीस म्हणत असतील तर ते धक्कादायक असल्याचं गजेंद्र पाटील म्हणाले. पोलीस यापूर्वी गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे असं म्हणाले होते. तब्बल 45 दिवस चौकशी चालली, आता गुन्हा डिसक्लोज होत नसेल तर हे माझ्यासाठी दुःखदायक आहे. मी दिलेले पुरावे सबळ होते. याबाबत मी 27 मे रोजी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. मी पंचवटी पोलिसात दिलेल्या तक्रारीत सर्व तथ्य मांडली आहेत. जबाबात सर्व दस्तावेज दिले आहेत आणि 9 डिजीटल पुरावे देखील दिले आहेत, असं गजेंद्र पाटील म्हणाले.
राज्यभरात परिवहन विभागात बदली करणार मोठं रॅकेट आहे. हे रॅकेट उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशिवाय चालू शकत नाही. बदल्यांना अधिकारी कुठून पैसे देतात. हे पैसे कुठून येतात याबाबतचे पुरावे देखील मी दिले आहेत. वरिष्ठ अधिकारी तडवी यांची तक्रार केल्याने माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जे आरोप करतात त्यांच्या विरोधात सिंडिकेट कारवाई केली जाते, असा दावा देखील गजेंद्र पाटील यांनी केला.
गजेंद्र पाटील यांनी मला गप्प करण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे आणि निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप केला. माझं निलंबन बेकायदेशीर आहे. न्यायालयात मी निर्दोष सिद्ध झालो, 27 मे रोजी रिट पिटीशन दाखल केलेली आहे. माझ्या पिटीशन नंतर चौकशी समिती स्थान झाली होती. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की न्यायालय माझ्या पुराव्यांच्या आधारे न्याय देईल, असं गजेंद्र पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या:
परिवहन विभागात गैरव्यवहाराचा आरोप, राज्याचे परिवहन आयुक्त नाशिकला जाणार, सूत्रांची माहिती
(Nashik suspended RTO officer Gajendra Patil said after 45 days of enquiry crime not disclosed is shocking)