नाशिक : नाशिकच्या (Nashik) गंजमाळ परिसरात दोन गटात जोरदार राडा झाला. दगडफेक आणि हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अत्यंत किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झाला होता. मात्र, यामुळे काही काळ शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गट मारहाण आणि दगडफेक करत रस्त्यावर आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना (Police) जमावाला पांगवताना मोठी कसरत करावी लागली. या तूफान दगडफेकीमध्ये अनेकांच्या डोक्याला गंभीर दुखापत देखील झालीयं. या संपूर्ण प्रकरणानंतर आता नाशिक पोलिसांनी धरपकड सुरू केली असून संबंधितांवर गुन्हे (Crime) नोंदवण्याचे काम सुरूयं.
गंजमाळ दगडफेक आणि हाणामारी प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 19 समाजकंटकांना बेड्या ठोकल्या आहेत. तर 35 संशयितांवर गुन्हा दाखल केले आहेत. पोलिसांकडून परिसरात बंदोबत कायम ठेवण्यात आलायं. जुन्या भांडणाची कुरापत काढत दोन गटात सुरू होती तूफान हाणामारी आणि त्यानंतर दोन्ही गट रस्त्यावर येत फ्री स्टाईल हाणामारी करत दगडफेक करत होते. हा सर्व प्रकार भर रस्त्यावर सुरू असल्याने अनेकांनी या हाणामारीचे व्हिडीओ शूट केले आहेत.
नाशिकच्या दगडफेक आणि हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. जमाव हाणामारी करत रस्त्यावर आल्याने या दगडफेकीत वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे कळते आहे. या दगडफेक आणि हाणामारी प्रकरणी आणखींन काहींना अटक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांकडून तब्बल 35 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.