Nashik | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची मनमाडला आढावा बैठक, कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दिल्या सूचना!

| Updated on: Jul 06, 2022 | 9:58 AM

बैठकीमध्ये मंत्री डॉ. भारती पवार यांनी कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्या अशी सूचना आरोग्य विभागाला दिल्याचे कळते आहे. शिवाय कोरोना अजूनही गेला नाही, त्यामुळे नागरिकांनी देखील मास्क वापरण्यासोबत इतर काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क वापरायला हवे.

Nashik | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची मनमाडला आढावा बैठक, कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दिल्या सूचना!
Image Credit source: tv9
Follow us on

मालेगाव : देशामध्ये कोरोनाच्या (Corona) रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. राज्यामध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण हे मुंबईत आहेत. मात्र, छोट्या शहरांमध्येही कोरोनाने पाय पसरवण्यास आता सुरूवात केलीयं. मालेगाव शहरामध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने धोका निर्माण झालायं. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी मनमाडला आरोग्य, महसूल, पालिका यासह इतर अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सध्या मनमाड, येवला, मालेगाव (Malegaon) आणि नांदगाव परिसरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने मंत्री भारती पवार यांनी चिंता व्यक्त केली.

वाढत्या कोरोना रूग्णसंख्येवर भारती पवार यांनी चिंता व्यक्त केली

बैठकीमध्ये मंत्री डॉ. भारती पवार यांनी कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्या अशी सूचना आरोग्य विभागाला दिल्याचे कळते आहे. शिवाय कोरोना अजूनही गेला नाही, त्यामुळे नागरिकांनी देखील मास्क वापरण्यासोबत इतर काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क वापरायला हवे. तसेच आपल्याला कोरोनापासून दूर राहिचे असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

छोट्या शहरांमध्ये वाढतोय कोरोना

नाशिक जिल्हातील मनमाड, येवला, नांदगावमध्ये कोरोनाचे रूग्ण सातत्याने वाढतांना दिसत आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने लग्न, साखरपुडा आणि इतर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोनाच्या नियमाचे पालन केले जात नाही. तसेच घराच्या बाहेर पडतांना नागरिक मास्क देखील वापरत नसल्याने कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते आहे.