सुरगाणा/नाशिक : सध्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लांब असल्या तरी आतापासूनच भावी मुख्यमंत्री पदासाठी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून पोस्टरबाजी सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाच्या चर्चेना आता उधान आले आहे.
आमदार नरहरी झिरवळ यांनी अजित पवार यांच्या गौरवोद्गगार काढत अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांनी अनेक गुणही त्यांनी सांगितले.
राज्यभरातून येणाऱ्या लोकांना अजित पवार यांच्याबद्दल काय वाटतं तेही नरहरी झिरवळ यांनी बोलून दाखवले. यावेळी ते म्हणाले की, बरेच लोकं म्हणतात की, दादा गरम आहेत मात्र दादा कामाच्या बाबतीत आग्रही असतात त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे अनेकांना त्यांचा धाक वाटतो असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कामाविषयी सांगतान नरहरी झिरवळ म्हणाले की, कामाच्या पातळीवर अजित पवार म्हणजे एक प्रकारची शिस्त आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना अजितदादां यांच्याहीपेक्षाआपण स्ट्रिक्ट झाले पाहिजे असं मतही त्यांना यावेळी व्यक्त केले.
अजित पवार यांच्या स्वभावाविषयी बोलताना नरहरी झिरवळ यांनी सांगितले की,’फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’ अशी उपमा देत अजित पवार यांचे झिरवळ यांनी त्यांचे कौतुक केले.
त्यांच्या कामामुळेच आता अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असंही त्यांना यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याबाबत बोलताना सांगितले की, मी मुख्यमंत्री यांच्याकडे जात नाही, तर तेच माझ्याकडे येतात आणि त्यांनाच माझ्याकडे यावं लागतं असा टोलाही त्यांना यावेळी लगावला आहे.