Neelam Gorhe: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांनाही विविध योजनांमध्ये सामावून घ्या; विधानपरिषद उप सभापती डॉ. गोऱ्हे यांच्या सूचना

| Updated on: Apr 16, 2022 | 4:06 PM

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कोरोनाकाळात निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना कृषी विभागाने घरपोच बियाणांचे वाटप करावे. येणाऱ्या काळात शेतीमालाच्या मार्केटिंगसाठी देखील मदत करावी. देशात फक्त महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये महिला धोरण लागू केले आहे. त्यामुळे प्रत्येक आस्थापनेवर विशाखा समिती गठित करावी.

Neelam Gorhe: आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील वारसांनाही विविध योजनांमध्ये सामावून घ्या; विधानपरिषद उप सभापती डॉ. गोऱ्हे यांच्या सूचना
विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा बैठक घेतली.
Follow us on

नाशिकः कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र समाधानकारक असून, आता विकासात्मक काम करण्यावर भर देण्यात यावा. नाशिक (Nashik) जिल्ह्याने कोरोनात अनाथ झालेल्या बालकांचे चांगले पुनर्वसन केले आहे. त्याचप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकरी (farmer) कुटुंबातील वारसांनाही विविध योजनांमध्ये सामावून घ्यावे, असे निर्देश विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी दिले आहेत. शासकीय विश्रामगृह, गोल्फ क्लब येथे नाशिक जिल्ह्यासाठी शासकीय स्तरावर झालेल्या विकास व पुनर्वसन योजना (कोरोना काळातील) मदत कार्याचा आढावा विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कामगार उपायुक्त विकास माळी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ, प्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.

नाशिकचा उपक्रम प्रेरणादायी…

डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, कोरोनात आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने निराधार झालेल्या बालकांचे सामजिक जाणिवेतून पुनर्वसन करावे. नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय मदत ग्रुपच्या माध्यमातून कोरोनात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना आधार दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचा हा उपक्रम नक्कीच आदर्श व प्रेरणादायी आहे.

समाधान शिबिर घ्यावे…

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, निराधार झालेल्या बालकांच्या नावाने ठेवण्यात आलेल्या ठेवींवर दरवर्षी त्या बालकाला व्याज वितरित व्हावे. यासाठी शिफारशी कळवाव्यात. सदर शिफारशींवर केंद्र व राज्य शासनाची त्याबाबत चर्चा करता येईल. कोरोनात निराधार झालेल्या महिलांसाठी समाधान शिबिर राबवून त्यांना शासकीय योजनांची माहिती द्यावी, असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

स्वयंसेवी संस्थांचे मदत घ्या…

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कामगार कल्याण विभागाने असंघटित कामगारांची नोंदणी केंद्र शासनाच्या ई-श्रम योजनेत नोंदणी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे मदत घ्यावी. तसेच कोरोनाकाळत ज्या प्रमाणे ऑनलाइन पोर्टलद्वारे माहिती दिली जात होती, त्याप्रमाणे आताही पोर्टल सुरू करावेत. या पोर्टलच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून किती बेड शिल्लक आहेत याची देखील माहिती त्यात नमूद असावी.

घरपोच बियाणांचे वाटप करा…

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कोरोनाकाळात निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना कृषी विभागाने घरपोच बियाणांचे वाटप करावे. येणाऱ्या काळात शेतीमालाच्या मार्केटिंगसाठी देखील मदत करावी. देशात फक्त महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये महिला धोरण लागू केले आहे. त्यामुळे प्रत्येक आस्थापनेवर विशाखा समिती गठित करावी. तसेच महिलांसाठी स्वच्छतागृह आणि ज्या ठिकाणी कॅन्टीन नसतील त्या ठिकाणी महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात यावे. बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम ,प्रादेशिक परिवहन विभाग व इतर विभागांचा आढावा घेतला.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!