आपल्या देशात G- 20 संमेलन झालं. यामुळे अनेक रोजगार येतात. शेती कशी करायची याबाबत लवकर मार्गदर्शन केलं जाणार आहे. 60 वर्षात तुम्ही काय केलं? कोविड काळात तीन वेळा विचारलं. आज या जगात 100 टक्के लसीकरण झालं. कोणत्याही अफवाला बळी पडून नका… रात्री मला गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोन आले. माझी तब्येत बरी नव्हती तरी आज मी इथं आले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यासाठी चांदोरी इथं महायुतीची सभा झाली. या सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या.
रात्री साडेबारा वाजता ही सभा ठरली. मोदींजीसाठी एक मत वाढणार असेल तर मी कुठे ही जायला तयार आहे. त्याचमुळे आजारी असतानाही मी इथं आले. भारती ताई आमची बहिणी आहे. त्यांना मोठ्या मतांनी विजयी करा… टोपीवाली सर्वांच शेती दिसत सर्वांच कांद्याचे शेतकरी आहे. मी जे बोलते ते 10 वर्षींनी ऐकवलं तरी मी माघार नाही घेणार नाही. पूर्वी मी नाशिक यायचे तर सात आठ तास लागत होते. आता समृद्धी महामार्गामुळे लवकर येते. या देशात सर्वात मोठी लोकशाही आहे. सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, असंही पंकजा मुंडे नाशिकमध्ये म्हणाल्या.
छत्रपती शिवराय जिजाऊचे संस्कार या महाराष्ट्रावर आहेत. या देशाचे प्रधानमंत्री कोण होणार? तर नरेंद्र मोदी होणार आम्ही छाती ठोक पण सांगतो. समोरच्याला विचार कोण होणार तर त्यांना सांगता येणार नाही. केदरनाथ वाहून गेलं. एका वर्षात उभं केलं. संविधान बदलणं इतकं सोपं नाही. भाजपला विरोधक मुस्लिम विरोधी म्हणतात… मग घरकुल योजना, शेतकरी योजना इतर योजना मुस्लिम समाजाला मिळाल्या ना…, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पाच वर्षे काम करत असताना कधीही भाजपने दुजाभाव केला नाही. तुमच्या सेवेसाठी माझा जन्म झालेला आहे. कांद्याबाबत बळीराजाला उत्पादन खर्चाचा निर्णय आपण घेतलेला आहे. शेतक-यांचा न्याय करण्यासाठी तो महत्वाचं आहे. द्राक्षांची ड्रायपोर्टस एक्सपोर्ट करा. या ट्रायपोर्टकडे लक्ष द्या, असं पंकजा मुंडे या सभेत म्हणाल्या.