नाशिक : नाशिकचे पोलीस आयु्क्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Dipak Pandey) हे सध्या हल्मेट सक्तीवरून (Helmet) आक्रमक झाले आहे. जो पेट्रोल पंप विनाहेल्मेट चालकाला पेट्रोल (Petrol) देईल त्याच्यावर कडक करावाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे पेट्रोल पंच चालाकांनी याविरोधात भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या निर्णया विरोधात पेट्रोलपंप चालक आक्रमक झालेत. हा निर्णय सक्तीचा असल्यास आम्ही गुडीपाडव्यादिवशी पेट्रोल पंप बंद ठेवू अशी भूमिका आता पेट्रोल विक्रेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीला नाशिककरांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील हेल्मेट सक्तीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. आता पुन्हा ऐन गुडीपाडव्याच्या तोंडावर आयुक्तांनी हा इशारा दिल्याने पेट्रोल विक्रेत्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
आपण दोन स्तरात हेल्मेट सक्ती राबवत आहोत. यात जे विना हेल्मेट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल. तसेच काही ठिकाणी समुपदेशनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र आता फक्त समुपदेशान होणार नाही. तर प्रत्येक चौकात पोलीस असतील ते दंड फाडतील. याबरोबर पेट्रोल पंप चालक आणि मालकांसाठीही वेगळा नियम असेल. जे पेट्रोल पंप विना हेल्मेट असलेल्या चालकाल पेट्रोल देतील. त्यांच्यावर चालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गृहीत धरून कारवाई करण्यात येईल, गुन्हे दाखल करण्यात येतील. असे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी सांगितले आहे. या अनुषंगाने कारवाई होईल, तसेच एकपेक्षा जास्तवेळी नियमाचे उल्लंघन झाल्यास तो पट्रोल पंप धोकादायक समजून बंद करण्याबाबत नोटीस बजावण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मागच्या काही दिवसांपासून पोलीस आयुक्तांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरत असल्याचे दिसून येत आहे. आज पोलीस आयुक्त दीपक पांडे हे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीला पोहोचले होते. पोलीस आयुक्त आणि शहरातील सांस्कृतिक मंडळांमधला वाद चिघळल्यानंतर ही भेट पार पडलीय. शहरातील नववर्ष स्वागत समितीला परवानगी नाकारल्याने हा वाद चिघळला आहे. आपली बदली झाली तरी चालेल पण माघार नाही अशी पोलीस आयुक्तांनी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांचा हाही निर्णय वादाचा राहिला आहे. आता सांस्कृतिक मंडळांच्या वादात भुजबळ तोडगा काढणार का ? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच आता पेट्रोल पंप चालकांच्या भूमिकेवर तोडगा निघणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.