आज चिमणी दिवस. मात्र, या चिमण्याच घरातून नाहीशा होतायत. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावचे छायाचित्रकार सुमित अहिरे यांनी काढलेली ही खास चित्रे.
चिमणी हा पक्षी शहरातून केव्हाच हद्दपार झाला आहे. खेड्यातही त्यांची संख्या दुर्मिळ होत चाललीय. हे पर्यावरणासाठी घातक समजले जात आहे.
आपल्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा म्हणजे चिमणी. मात्र, शहरात उगवलेल्या सिमेंटच्या जंगलामुळे चिमण्या आपल्यापासून दूर जातायत.
अनेक ठिकाणी चिमण्यांना वाचवण्यासाठी वेगवेगळे अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतायत.