मालेगाव : मालेगावात (Malegaon) सध्या काहीसे तणावाचे वातावरण आहे. मालेगावत मुस्लिम समाजाची (Muslim) संख्या मोठी आहे. याचाच फायदा घेऊन काही लोक दंगली (Riots) घडवण्याच्या प्रयत्नात आसल्याचा आरोप होत आहे. हा आरोप माजी आमदार शेख रशीद यांनी केला आहे. मुस्लीम वस्तीत असलेल्या उर्दूघरावर भगवा ध्वज तर राष्ट्रीय एकात्मता चौकास मुस्कान खानचे नाव द्यायचे किंवा संवेदनशील स्थळी हिरवा झेंडा लावायचा. असा प्रयत्न काही राजकीय लोकांतर्फे होत असल्याचा शेख यांचा आरोप आहे.हे कारस्थान रचून पुन्हा अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे शेख यांनी सांगितले आहे. देशात आधीच हिजाबवरून मोठा वाद सुरू आहे. कर्नाटकात झालेल्या या वादाचे पडसाद संपूर्ण देशभर पोहोचले आहे. यावरून महाराष्ट्रभरही आंदोलनं झाली. कर्नाटकात हिजाब घालून घोषणा देणारी मुस्कान याच वादामुळे देशभर पोहोचली आहे.
राजकीय स्वार्थासाठी कारस्थान रचण्याचा प्रयत्न
येत्या काळात होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी काहीच मुद्दे नसल्याने राजकीय लाभ मिळावा, यासाठी हिंदू-मुस्लीम समाजात वाद निर्माण करून शहराला अशांत करत आगीत झोकण्याचा प्रयत्न काही लोकांतर्फे सुरू आहेत. अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितली आहे. त्यामुळे पुन्हा खळबळ माजली आहे. हिजाबवरून मालेगावतही सर्वात मोठे आंदोलन उभा राहिल्याचे दिसून आले. देशात सध्या यावरून दोन गट पडले आहे. काहींचा हिजाबला विरोधत आहे. तर काही जणांकडून हिजाबचे समर्थन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षही यात भूमिका घेताना दिसून आले. राज्यातल्या अनेक पक्षातील महिलांनी हिजाबसाठी आंदोलनही केली आहेत. यावरून आता राजकारण तापलं आहे.
पोलीस प्रशासन पुन्हा अलर्ट मोडवर
मालेगाव शहराला पुन्हा दंगलीच्या माध्यमातून आगीत लोटणार्यांचे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडावेत. तसेच शहरातील दोन्ही समाजातील युवकांनी सावध रहात कुणाच्याही दिशाभूलीस बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी आ. शेख रशीद यांनी केले आहे.शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकिय लोकांतर्फे स्वत:च्या स्वार्थासाठी सुरू असल्याचा आरोप देखील शेख यांनी केला आहे. तसेच शहराचे वातावरण खराब व्हावे,अशी परिस्थिती तयार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मालेगावत पोलीस प्रशासनही आता अलर्ट मोडवर आले आहे. काही राजकीय फायद्यासाठी अशा गोष्टी घडवून आणण्याचे प्रयत्न याआधीही अनेकदा झाले आहेत. मात्र दोन्ही बाजुकडील लोकांनी याला हवा न देता, अशा प्रयत्नांना हाणून पाडणे गरजेचे आहे.
राजकारणातलं वाढलेलं प्रदूषण संपणार, आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात
सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील, नाना पटोलेंचा मोदींना इशारा