केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाशिक दौऱ्यावर असताना अनेक मुद्यांवर भाष्य केले. महायुती सरकारमध्ये मंत्री पदाची आशा आहे. त्यांनी मंत्रिमंडळाचा लवकरात लवकर विस्तार करण्याची मागणी केली आहे. संविधान कुणालाच बदलता येणार नाही, असे ते म्हणाले. तर याचवेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला हाणला. तर महाविकास आघाडीला सुद्धा त्यांनी चिमटा काढला. काय म्हणाले आठवले?
दोन मंत्री पदाची मागणी
विधानसभा निवडणूक रणधुमाळी संपल्यावर नाशिक दौऱ्यावर आलो आहे. लोकसभेला नुकसान झाले विधानसभेला यश आले, असे रामदास आठवले म्हणाले. अरक्षण जाणार असा प्रचार करणाऱ्यांना मतदारांनी उत्तर दिले आहे. लाडकी बहीण, महिलांनी मतदान केले. संविधान हे राजकारण पलीकडे आहे. संविधान कोणाच्या बापाला बदलता येणार नाही. मुख्यमंत्री पदाची त्यांच्यात महाविकास आघाडीत रेस होती. आमच्या तिन्ही नेत्यांनी अगोरदच सांगीतले होते की आम्ही रेस मध्ये नाही. नाशिक मध्ये सर्वात मोठी धम्म परिषद घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्रिमंडळचा विस्तार लवकर करावा अशी मागणी करत त्यांच्या पक्षाला दोन मंत्रीपद मिळणार असल्याचा दावा केला.
महाविकास आघाडीने पराभव मान्य करावा
लोकसभेला महायुतीला अपयश आले तेव्हा, आम्ही ईव्हीएम खराब असे म्हणालो का? असा प्रश्न त्यांनी केला. महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये असे ते म्हणाले. ईव्हीएम मशीन तर याच लोकांनी आणली. आता पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या की नाही हे निवडणूक आयोग ठरवेल असे ते म्हणाले. महाविकास आघाडीने आता पराभव मान्य करावा असा चिमटा त्यांनी काढला.
राज ठाकरे यांच्यावर टीका
रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली त्यांना वाटायचे माझ्या शिवाय सत्ता येणार नाही त्यांचे स्वप्न भंग झाले. राज ठाकरे त्यांना महायुतीत घेण्यात फायदा नाही मी असताना त्यांची काय गरज आहे, असा खोचक टोला आठवले यांनी लगावला. राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन फायदा नाही. राज ठाकरेंची मी असताना महायुतीला गरज नाही.
राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली. त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे असा चिमटा त्यांनी राज ठाकरे यांना काढला.