नाशिक : काही जण अजित पवार यांना वीलन बनवत आहेत. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या गटावर आरोप केलाय. मी मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर रोहित पवार यांचा जन्म झाला. मी रोहित पवार यांना फार महत्त्व देत नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हंटलं. रोहित पवार यांनीही छगन भुजबळ यांच्या टीकेला उत्तर दिलंय. तुम्ही ४० वर्षे विसरलात का. तुम्ही विचारधारा सोडली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
रोहित पवार म्हणाले, मी गेलो तिथं पोस्टरवर अजित दादा यांचा फोटोही नव्हता. त्यामुळे अजित पवार यांना चार-पाच लोकं वीलन करत आहेत, असं मला वाटतं. दादा मोठे नेते आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला पटला नाही. लोकांनाही पटला नाही. एसीमध्ये राहून मजा मारणारं राजकारण चाललंय. कुटुंब कुणी फोडलं पार्टी कुणी फोडली हे लोकांना माहीत आहे.
छगन भुजबळ हे रोहित पवार यांना म्हणाले, मी जानेवारी, फेब्रुवारी १९८५ ला आमदार झालो. एप्रिल १९८५ ला मुंबईचा महापौर झालो. त्यानंतर चार महिन्यांनी तुमचा जन्म झाला. त्यामुळं मला मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करू नका. इतिहास जाणून घ्या. मी त्यांना जास्त किंमत देत नाही. ते जेवढे पुढे येतील, तेवढे त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देणार आहे.
यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत. त्यांचा संघर्ष मोठा आहे. मी ३७ वर्षांचा असताना जी भूमिका घेतली तीच मी साठीत असताना घेतली असती. सदाभाऊ खोत शरद पवार यांच्या विरोधात बोलतात. हे नेते भाजपसोबत आहेत. खोत यांच्या विरोधात पवार यांच्या बाजूने कुणी भूमिका घेतली. तुम्ही ४० वर्षे विसरलात का. माझ्या मतदारसंघात या. सभा घ्या. मला पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करा, असं आव्हान रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांना दिलं.