नाशिक : आता आमचं हे काम राहील की, गावोगावी हा सैतान येता कामा नये, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. खोत यांनी शरद पवार यांचा उल्लेख सैतान म्हणून केला. या सैतानाला गावगाड्यात येऊ देऊ नका, असंही विधान केलं. शरद पवार यांच्याविरोधात भाजपनं मोठा सूड उगवला. त्यामुळे शरद पवार यांना गावगाड्यात यावं लागत आहे. जो पाप करतो त्याला येथेच फेडावं लागतं. शरद पवार यांना त्यांचं पाप फेडावं लागत आहे. हा सैदान गावगाड्यात परत येता कामा नये, हे आमचं काम राहील, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हंटलं. सदाभाऊ खोत हे भाजप समर्थक मानले जातात.
अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे म्हणाले, शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. विकृत मनोवृत्तीतून असा विचार व्यक्त करणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो आहोत. छगन भुजबळ म्हणाले, कोणत्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना आपण आपली भाषा ही संयमाने वापरली पाहिजे. अशी माझी सर्वांना विनंती आहे.
सदाभाऊ खोतांविरोधात निषेधाव्यतिरिक्त ठोस भूमिका का घेतली नाही, असा सवाल रोहित पवार यांनी केला. त्यावर रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या बाजूने अजित पवार गटातील कुणी भूमिका घेतली. तुम्ही ४० ते ३५ वर्षांचे अनुभवी आहात. मग तुम्ही सर्व विसरले का. भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. मी ३७ वर्षांचा असेन तरी भूमिका घेतो. तुम्ही माझ्या मतदारसंघात या. सभा लावा. मला निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न करा, असं आव्हान रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांना दिलं.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सदाभाऊ खोतांविरोधात पुणे, सोलापुरात आंदोलनं केली. मात्र, अजित पवार गटाने याबाबत कोणतंही आंदोलन केलं नाही. कालपासून सिंचन आणि शिखर बँकेवरून सदाभाऊ खोत टीका करत होते. पण, अजित पवार हे भाजपात आल्याने खोत यांनी जणूकाही क्लीनचीट दिली आहे.
सहकार चळवळीला घरघर का लागली. तुम्ही आमदार मंत्री होता, तरी बँकेतील पदं तुम्हाला का हवं होत, असा सवाल काल सदाभाऊ खोत विचारत होते. सहकार क्षेत्रातील ५५ साखर कारखाने हे खासगी कोणी केले, याचा शोध घेतला पाहिजे, असं सदाभाऊ खोत काल म्हणाले.
पण आज अजित पवार गट वेगळं झाल्यानंतर भाजपचे लोकं हे शरद पवार यांना टार्गेट करू लागले. ८२ वर्षांच्या व्यक्तीला योद्धा का म्हणावं. सैन्यात ८२ वर्षीच्या व्यक्तीला घेत नाहीत. अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.