…तेव्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरु होणार; संजय राऊतांचं मोठं विधान

| Updated on: Sep 25, 2024 | 10:53 AM

Sanjay Raut on Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही राऊतांनी निशाणा साधला आहे. राऊत काय म्हणाले? वाचा सविस्तर...

...तेव्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदावरून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरु होणार; संजय राऊतांचं मोठं विधान
नरेंद्र मोदी, संजय राऊत
Image Credit source: ANI
Follow us on

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर बोलताना नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे. महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक हरतील. त्या दिवशी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून उतरवण्याची क्रिया- प्रक्रिया सुरु झालेली असेल, असं संजय राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लाचार आहेत. स्वाभिमान शून्य आहेत, अशा शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

अमित शाह यांच्यावर निशाणा

धोका कुणी- कुणाला दिलाय हे महाराष्ट्र जाणतो. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत हिशोब चुकता केला. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वत: अमित शाह यांनी महाराष्ट्राला आणि शिवसेनेला धोका दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जी चर्चा झाली. जे शब्द दिले घेतले. त्याबाबत धोकेबाजी ही अमित शाह यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत हिशोब चुकता केला. त्यामुळे राज्यातील जनता कुणावर विश्वास ठेवते हे नव्याने सांगायला नको, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

अमित शाह यांचा मुलगा जरी महाराष्ट्रात आला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या स्वागताला जातील. लाचार, लोचट, स्वाभिमानी शून्य सरकार या ठिकाणी बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणारच…. अमित शाह भाजपच्या आढावा बैठकीसाठी येत आहेत आणि त्यांच्या स्वागताला मुख्यमंत्री येणार असं त्यांच्या लोकांनी सांगितलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री दिल्लीची किती चाटूगिरी करत आहेत. हे दिसतंय, असं राऊत म्हणाले.

हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. एका मर्यादे पलिकडं महाराष्ट्राच्या राजकारणात चाटूगिरी दिसली नाही. पण जर मुख्यमंत्री येणार असल्याचे होर्डिंग लागत असतील तर ते येतील सुद्धा… मुख्यमंत्र्यांना काम तरी काय आहे? ज्यांनी खोटेनाटे कृत्य करून खुर्चीवर बसवले. ते गॉड फादर येत आहेत. तर मुख्यमंत्री स्वागताला येऊ शकतात, असा घणाघात संजय राऊतांनी केलाय.