नाशिक : गुढीपाडव्याला केलेल्या भाषणापासून राज ठाकरे (Raj Thackeray) चर्चेत आहे. मशिदींवरील भोंग्यांवर केलेल्या विरोधामुळे राज ठाकरे यांच्यावरुन प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. अशात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे ओवैसी म्हटलंय. भाजपनं (BJP) यूपीत असदुद्दीन ओवैसींकडून जे करुन घेतलं, तेच महाराष्ट्रात राज ठाकरेंकडून केलं जात असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. राऊतांच्या या वक्तव्याला आता राज ठाकरे कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान, राज ठाकरेंच्या कोणत्याही गोष्टीनं शिवसेनेला कोणताही फरक पडणार नाही, असंही ते पुढे म्हणालेत. दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरेंसोबत किरीट सोमय्या यांनाही प्रत्युत्तर दिलंय.
राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारल्यावर संजय राऊत यांनी म्हटलंय, की
यूपीमध्ये भारतीय जनता पक्षानं एमआयएमचा वापर करुन घेतला. तसाच प्रकार आता मराठी माणसाच्या महाराष्ट्रात करायचा भाजपचा मनसुबा आहे. महाराष्ट्राच्या हिताविरोधात सर्व काही सुरु आहे. राज ठाकरे जी भूमिका घेतात, नेत्यांवर जी टीका करतात, त्याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेला बरोबर कळतोय.
राज ठाकरे यांची सगळ्यात आधी पुण्यात सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांची नक्कलही करुन दाखवली होती. दरम्यान, गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकांवरुनही राजकारण तापलंय. दरम्यान गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या सभेनंतर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेतून स्पष्टीकरण दिलं होतं.
दरम्यान, नाशिकमध्ये किरीट सोमय्या यांच्यावरुनही संजय राऊत यांना सवाल करण्यात आले. त्यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आयएनएस विक्रांतवरील घोटाळ्यावरुन सोमय्यांवर हल्लाबोल केला. राजभवनाच्या प्रशासनाकडूनही ज्या घोटाळ्याला दुजोरा मिळतो, अशा व्यक्तीच्या आरोपांना का महत्त्व द्यायचं, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधलाय. तसंच यावेळी संजय राऊतांनी टॉयलेट घोटाळ्यावरुनही सोमय्यांवर हल्लाबोल केला. मला कागद फडकवणं मान्य नाही. मी रीतसर तक्रार करणार असल्याचंही राऊतांनी यावेळी म्हटलंय.
जेम्स लेनचे पुस्तक वादग्रस्तच; पुरंदरे यांची हकनाक बदनामी सुरू, पवार आत्ताच का याच राजकारण करत आहेत
राज ठाकरेंना सभेत तलवार दाखवणं अंगलट, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल
Raj Thackeray Speech: लवंडे म्हणजे काय रे भाऊ? अनुस्वाराची किंमत एका शब्दांनं अधोरेखित केली!