नाशिक जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा उघडणार; कोरोना नियमांचे काटेकोर पालन

| Updated on: Jan 21, 2022 | 6:28 PM

येत्या 24 जानेवारी सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. नाशिक ग्रामीणमधील शाळा देखील सोमवारीच सुरू होणार आहेत. याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून पुन्हा उघडणार; कोरोना नियमांचे काटेकोर पालन
संग्रहित छायाचित्र
Follow us on

नाशिक : राज्यात कोरोनाचे (Corona)  रुग्ण कमी होत आहे, असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोना सोबतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने (Omicron) देखील राज्यात शिरकाव केल्याने चिंता आणखी वाढली होती. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा (School), कॉलेज बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र आता हळूहूळ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 24 जानेवारी सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. नाशिक ग्रामीणमधील शाळा देखील सोमवारीच सुरू होणार आहेत. याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी माहिती दिली आहे. नाशिक ग्रामीणमधील शाळा येत्या सोमवारपासून सुरू होणार आहेत. याबाबत औपचारिक आदेश लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी म्हटले.

काय म्हणाले जिल्हाधिकारी?

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हळहळू  जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच शाळा सूरू करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित यंत्रणांनी करोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे  देखील यावेळी मांढरे यांनी म्हटले.

कोरोना नियमांचे पालन कण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

दरम्यान  सोमवार दि.  24 जानेवारी 2022 पासून राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राथमिकता असून, कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी देखील दिले आहेत. यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की,राज्यात पुन्हा शाळा सुरू होत असताना स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या ठिकाणी कोविडच्या रुग्णांचा दर अधिक असेल तेथे जिल्हा प्रशासनासमवेत चर्चा करून निर्णय घेण्यात यावेत. शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण लवकरात लवकर होण्यासाठी शाळांनी जिल्हा प्रशासनासोबत प्रयत्न करावेत. सर्व संबंधितांनी मास्कचा वापर करण्याबरोबरच वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

औरंगाबादच्या पर्यटन स्थळांचे डीपीआर तयार करण्याच्या सूचना, वाचा कोणत्या नव्या प्रकल्पांचा समावेश?

बोलघेवड्या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्री पिजऱ्यातून बाहेर यायला तयार नाहीत-सदाभाऊ खोत

Why I Killed Gandhi: अमोल कोल्हेंनी कलावंत म्हणून गोडसे साकारला असेल तर गांधीविरोधक ठरत नाही, शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण