शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, दावा करणार; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा इशारा

| Updated on: Jan 09, 2023 | 1:16 PM

आमचा खरा देव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या सोबत आहेत. तुम्ही स्वतः सरपंचपदाची निवडणूक लढवली नाही. राऊत यांचा डीएनए शिवसेनेचा नाहीच.

शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, दावा करणार; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा इशारा
शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर, दावा करणार; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नाशिक: नाशिकमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे. तुम्ही कुठे यायचं ते सांगा, आम्ही तिथे येतो, असं आव्हान देतानाच नाशिकचं शिवसेना कार्यालय माझ्या वडिलांच्या नावावर होतं, त्यावर मी दावा करणार आहे, असा इशाराच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट ठाकरे गटावर अंगावर घेतलं आहे. संजय राऊत हे शरद पवारांकडे जाऊन शिवसेना संपवण्याचं काम करत आहेत. संजय राऊत तुडवा तुडवी काय असते हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. कुठे यायचं ते सांगा. आम्ही पालापाचोळा आहोत का ते दिसून येईल, असं आव्हानच शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी दिलं.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत म्हणतात मी जे गेले त्यांना ओळखत नाही. पण तुम्हाला सांगतो. माझ्या वडिलांच्या नावावर शिवसेना कार्यालय आहे. या मध्यवर्ती कार्यालयावर आम्ही दावा करणार आहोत, असा इशाराच रुपेश पालकर यांनी दिला. तर, राऊत फक्त हिशोब घ्यायला नाशिकला येतात, असा आरोप प्रवीण तिदमे यांनी केला आहे.

राऊत शनिवार-रविवारी फक्त पर्यटनासाठी नाशिकला येतात. शिवसेना हा वटवृक्ष आहे. पण संजय राऊत यांच्यासारखी बांडगुळं वटवृक्ष संपवतात. राऊत स्वतःला प्रति उद्धव ठाकरे समजतात. त्या दिवशी म्हणाले चप्पल चोर गेले. आम्ही चप्पल चोर नाही.

आमचा खरा देव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या सोबत आहेत. तुम्ही स्वतः सरपंचपदाची निवडणूक लढवली नाही. राऊत यांचा डीएनए शिवसेनेचा नाहीच, अशी टीका शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते यांनी केली.

यावेळी हेमंत गोडसे यांनीही शिंदे गटावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसलासोबत घेण्याचे कट कारस्थान संजय राऊत यांचेच होते. या अनैसर्गिक युतीला राऊतच कारणीभूत आहेत. सत्ता असताना देखील आम्ही साध्या शिपायाची बदली करू शकत नव्हतो, अशी टीका खासदार हेमंत गोडसे यांनी केली.