साईबाबांच्या दारी आनंदवार्ता; दर्शनासाठीचे बायोमेट्रिक पास बंद, एप्रिलपासून अभिषेक सुरू!

| Updated on: Mar 29, 2022 | 7:05 AM

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेकांचे जगणे हैराण करून टाकले आहे. त्यात शिर्डी येथे सुरू असलेले अभिषेक आणि सत्यनारायण हे कोविड प्रतिबंधक नियमांमुळे बंद करण्यात आले होते. आता येत्या शुक्रवारी म्हणजेच 1 एप्रिलपासून हे अभिषेक, सत्यनारायण सुरू करण्यात येणार आहेत.

साईबाबांच्या दारी आनंदवार्ता; दर्शनासाठीचे बायोमेट्रिक पास बंद, एप्रिलपासून अभिषेक सुरू!
शिर्डी येथील साईबाबांची लोभस मूर्ती.
Follow us on

जगभरातून शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांच्या (Saibaba) चरणी माथा टेकविण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी. आता साईंच्या दर्शनासाठी असलेले आणि भाविकांसाठी अतिशय त्रासदायक ठरणारे बायोमेट्रिक दर्शन पास (Biometric darshan pass) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच यापुढे आता शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी केवळ झटपट आणि व्हीआयपी पास सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. सध्या कोविडचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी 95 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यातील 21 लाख रुपये हे ग्रामस्थांच्या यात्रा समिती कार्यक्रमासाठी देण्यात येणार आहेत. यंदाच्या रामनवमी उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो परंपरा येण्याची शक्यताय. कोरोनामुळे गेली दोन वर्षे या उत्सवात खंड पडला होता.

एप्रिलपासून अभिषेक होणार सुरू

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेकांचे जगणे हैराण करून टाकले आहे. त्यात शिर्डी येथे सुरू असलेले अभिषेक आणि सत्यनारायण हे कोविड प्रतिबंधक नियमांमुळे बंद करण्यात आले होते. आता येत्या शुक्रवारी म्हणजेच 1 एप्रिलपासून हे अभिषेक, सत्यनारायण सुरू करण्यात येणार आहेत. मंदिरातील बॅरिकेड्स हटवण्यात येणार आहेत. सोबतच द्वारावती भक्तनिवास समोरची बाग आणि ग्रामदैवतांचे दर्शनही भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

महामार्गावर महाद्वार उभारणार

शिर्डीतून जाणाऱ्या नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी साई संस्थानाकडून महाद्वार उभारण्यात येणार आहेत. त्यासाठीच यंत्रणांकडून लवकरच परवानगी घेण्यात येणार आहे. शिर्डीमध्ये अनेक भाविकांना त्रास देण्याच्या घटना घडतात. याची तक्रारही संस्थानाकडे आली आहे. अशा टवाळखोरांचा संस्थानच्या वतीने पोलिसांची मदत घेऊन बंदोबस्त करण्यात येणार आहे, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते.

शिर्डी मंदिरातील कार्यक्रम

– पहाटे 04.45 वाजता मंदिर उघडते

– पहाटे 05.00 वाजता भूपाळी

– पहाटे 05.15 वाजता काकड आरती, समाधीस नैवेद्यार्पण

– सकाळी 05.50 वाजता मंदिरात मूर्ती आणि समाधीला मंगलस्थान.

– सकाळी 06.20 वाजता आरती.

– सकाळी 06.25 वाजता दर्शनाला सुरुवात.

– सकाळी 11:30 वाजता द्वारकामाई धुनी पूजा.

– दुपारी 12.00 वाजता आरती.

– दुपारी 04.00 वाजता पोथी.

– सूर्यास्तावेळी आरती.

– रात्री 08.30 ते 10.00 दरम्यान भजन, कीर्तन, गायन.

– रात्री 10.00 वाजता शेजारती.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?