नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का, परवा राऊतांसोबत आज शिंदे गटात, नेमकं काय घडलं

| Updated on: Dec 16, 2022 | 11:57 PM

लोकं दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल. कालपर्यंत ते चांगले आज ते दलाल. ही जी भाषा संजय राऊत वापरतात.

नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का, परवा राऊतांसोबत आज शिंदे गटात, नेमकं काय घडलं
Follow us on

नाशिक : नाशिक महापालिकेतील ठाकरे गटातल्या ११ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे संजय राऊत हे दोन दिवस नाशिकमध्ये होते. पण, संजय राऊत मुंबईत पोहचताच या ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला रामराम केला. यावरून संजय राऊत आणि सत्ताधारी यांची चांगलीच जुंपली. संजय राऊत म्हणाले, दलाल आहेत जमिनीचे दोन नंबरचे व्यवसाय करणारे. पोलीस यंत्रणा दबाव आणून त्यांना शिंदे गटात प्रवेश करायला लावते. तीसरं म्हणजे त्यांना निष्ठा, श्रद्धा हा विषयचं माहीत नाही.

जे गेलेत त्यांचा सगळ्यांचा व्यवसाय हा दलाली आहे. मंत्रालयात जाऊन दलाली करणं. कंत्राटदार, ठेकेदारी करणं. ज्याचं सरकार येईल, तिथं ते जात असतात. २०२४ मध्ये ही झुंड पुन्हा आमच्या दारात उभी राहिलेली दिसेल, असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्या पक्षावर लोकांचा विश्वास उरला नाही. म्हणून लोकं दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल. कालपर्यंत ते चांगले आज ते दलाल. ही जी भाषा संजय राऊत वापरतात. याचा लोकांना राग येतो. लोकं त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत.

शिंदे गटात परतलेल्या नगरसेवकांनीही संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. आम्हाला बोलायला भाग पाडू नका, असा इशाराचं त्यांनी संजय राऊत यांना दिला. कोणाला दलाल म्हणता. कोणाचे दारू-मटक्याचे अड्डे आहेत. सांगावं ना. आम्ही राऊतांसारखी सिल्व्हर ओकची दलाली करत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळं राजकारण कोणत्या दिशेला जातंय काही सांगता येत नाही.