VIDEO | नाग आणि मुंगूसाचा थरकाप उडविणारा व्हिडिओ, नाग घरात शिरल्यानंतर मोबाईल शूट करणाऱ्या व्यक्तीला घाम फुटला

| Updated on: Jun 20, 2023 | 9:35 AM

VIRAL VIDEO | नाग पाहिल्यानंतर चांगल्यांना घाम फुटतो, काहीवेळेला तुम्ही नागाच्या परिसरात गेल्यानंतर, तो तुम्हाला पाहून फणा काढतो किंवा तिथून बिळात निघून जातो. परंतु सध्या एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून अनेकांना घाम फुटला आहे.

VIDEO | नाग आणि मुंगूसाचा थरकाप उडविणारा व्हिडिओ, नाग घरात शिरल्यानंतर मोबाईल शूट करणाऱ्या व्यक्तीला घाम फुटला
snake and mongoose fight video
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल (viral video) झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये नाग आणि मुंगूसमध्ये घनघोर युद्ध पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे दोघांचं भांडण हे शेतात असलेल्या घराच्या कोपऱ्यात सुरु आहे. साप हा एकमेव असा प्राणी आहे जो मुंगूसाला (snake and mongoose fight video) प्रचंड घाबरतो. दोन प्राण्याचं भांडणं सुरु असताना तिथं एक व्यक्ती गेली आहे. त्या व्यक्तीने त्या दोघाचं भांडणं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलं आहे. ज्यावेळी सापाची मुंगूसाच्या तावडीतून सुटका होते, त्यावेळी साप थेट घरात शिरतो. त्यानंतर काय झालंय ते तुम्ही व्हिडीओत पाहा.

नाग दिसला तर चांगल्या चांगल्यांची बोबडी

लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला अधिक आवडते. त्याचबरोबर त्यांच्या भांडणांचे व्हिडीओ अधिक व्हायरल होतात. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. नाग दिसला तर चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते. असाच थरकाप उडविणारा नागाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शेताजवळील घराच्या बाहेर नागाच्या मागे मुंगूस लागल्याचे दिसते. या मुगसाला घाबरून त्याच्या तावडीतून सुटून हा सहा ते सात फूट लांब काळ्या रंगाचा नाग थेट घराच्या बाहेरील आवारात असलेल्या बाळाच्या झोळीवर चढताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

उष्णता वाढली असून साप बिळाच्या बाहेर येत आहेत

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक दुचाकी दिसत असून त्याचा नंबर एमएच 15 म्हणजे नाशिक जिल्ह्याची पासिंगची ही दुचाकी असून, यावरून हा व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील असल्याचे समजते. मात्र अद्याप हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठल्या ठिकाणचा आहे, हे समजलेलं नाही. सध्या उष्णता वाढली असून साप बिळाच्या बाहेर येत आहेत. तसेच शेतातील घर किंवा शेतात काम करताना सर्प दंशाच्या घटना देखील घडत आहेत. त्यात विषारी सापाने दंश केल्यावर अनेक मृत्यू देखील झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील दक्षता बाळगावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

ग्रामीण भागात जे नागरिक राहतात, ज्यांची घर शेतात आहे. किंवा ज्यांच्या घराच्या बाजूला शेती आहे, अशा ठिकाणी असे सर्रास प्रकार पाहायला मिळतात.