इगतपुरी : महाराष्ट्रात जशी ऊसाची शेती वाढली, तसं बिबट्याचं (Igatpuri leapard) राहण्याची व्यवस्था झाली असं अनेकजण म्हणत आहेत. कारण एकदा ऊसाच्या शेतीचा आसरा बिबट्याला मिळाली की, तो ती जागा शक्यतो सोडत नाही. तिथं काही ना काही शिकार करुन तो राहत असतो. बिबट्याने (nashik leopard) आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. त्यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. तर काही शेतकऱ्यांचा जीव देखील गेला आहे. तोचं शेतातला बिबट्या (maharashtra nashik leopard news in marathi) आता शिकारीच्या शोधात घराच्या आजूबाजूला फिरत आहे. काल इगतपुरी तालुक्यात बिबट्या दोनवेळा घराच्या अंगणातून परतला असल्याचं नागरिक सांगत आहेत.
इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे. रात्री 10 वाजेच्या सुमारास बोरटेंभे येथील भानुदास नवले यांच्या घरासमोरील अंगणात बिबट्या आला, त्यावेळी बिबट्याला पाहून कुत्रे जोरात ओरडू लागले. नवले कुटुंबीयांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ घराचे पत्रे वाजवले असता बिबट्या पळून गेला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मात्र पुन्हा पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास बिबट्या परत त्याचं ठिकाणी दबक्या पावलाने आला. त्याने पिंजऱ्यातील कुत्र्याला भक्ष्य बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रे परत जोरात भुंकू लागल्याने त्यांनी बाहेरील लाईट चालू केली. लाईट चालू झाल्यावर बिबट्याने धूम ठोकली. येताना आणि जाताना बिबट्याचा मुक्त संचार त्यांनी लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेमुळे त्या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. मात्र वनविभागाने त्यांच्याकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा नसल्याचे सांगितले यामुळे परिसरातील नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.