Nashik Municipal Corporation Election | महापालिका निवडणुकांचा घोळ मिटता मिटेना, नाशिक महापालिकेची सदस्य संख्या पुन्हा 122 होणार

| Updated on: Aug 04, 2022 | 10:50 AM

राज्यात महापालिका निवडणूकांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. 2017 ला एका प्रभागामधून चार नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर नव्या सरकारने काही बदल करत एका प्रभागातून तीन नगरसेवक असा निर्णय घेत प्रभागांमध्ये मोठे बदल केले होते.

Nashik Municipal Corporation Election | महापालिका निवडणुकांचा घोळ मिटता मिटेना, नाशिक महापालिकेची सदस्य संख्या पुन्हा 122 होणार
Follow us on

नाशिक : राज्यात महापालिका निवडणुकांचा (Election) घोळ मिटता मिटेना. नाशिक महापालिकेची सदस्य संख्या पुन्हा 122 होणार आहे. 2017 प्रमाणेच प्रभाग रचना ठेवण्याच्या निर्णयामुळे आणखी गोंधळात गोंधळ निर्माण झालायं. काही इच्छुकांची तयारी पाण्यात गेल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळते आहे. तर काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राजकीय (Political) सारीपाटात महापालिका यंत्रणा देखील वैतागली आहे. नाशिक (Nashik) मनपा आरक्षण सोडतीवर प्रभाग 35 मधून एक हरकत दाखल झालीय. हरकती आणि सूचना दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

राज्यात महापालिका निवडणूकांमध्ये मोठा गोंधळ सुरूच

राज्यात महापालिका निवडणूकांमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. 2017 ला एका प्रभागामधून चार नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर नव्या सरकारने काही बदल करत एका प्रभागातून तीन नगरसेवक असा निर्णय घेत प्रभागांमध्ये मोठे बदल केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी मोठी बंडखोरी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळवले. आता राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचे सरकार आहे. आता 2017 प्रमाणेच प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठा गोंधळ उडालायं.

हे सुद्धा वाचा

2017 प्रमाणेच प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठा गोंधळ

सर्वोच्च न्यायालयाने 4 मे 2022 आणि 20 जुलै 2022 च्या आदेशात 10 मार्च 2022 रोजी प्रभागरचनेबाबत जी स्थिती होती, त्या आधारेच महापालिका निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशच धाब्यावर बसवल्याचा तसेच चार सदस्यीय प्रभागरचना रद्द करून त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत अंमलात आणल्याचा आरोप केला जातोयं. नाशिकची एकूण लोकसंख्या 14,86,053 एवढी आहे. नाशिकमधील अनुसूचित जातीची लोकसंख्या 2,14,620 एवढी असून अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1,07,456 एवढी आहे.