नाशिक : नाशिकच्या (Nashik) गंजमाळ परिसरात दोन गटात जोरदार राडा झालायं. यामुळे एकच खळबळ निर्माण झालीयं. दगडफेक आणि हाणामारीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावर आलेल्या जमावामुळे वाहतूक कोंडी (Traffic congestion) प्रचंड झाल्याचे चित्र असून वाहनांच्या मोठं मोठ्या रांगा परिसरात बघायला मिळता येत. किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोयं. मात्र, जमावाला पांगवताना पोलिसांचे (Police) नाके नऊ आल्याचे दिसले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी जमावाला पांगवले.
दोन गटाने रस्त्यावर येत राडा केला. यामुळे काही काळ गंजमाळ परिसरात तणावाचे वातावरण बघायला मिळाले. यादरम्यान परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दगडफेक आणि हाणामारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे. दोन गटातील राड्याबद्दल पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
गंजमाळ परिसरात तुफान हाणामारी आणि दगडफेक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही गटाला पांगवण्याचे काम पोलिसांनी केली. मात्र, एका तासानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला पांगवले. या दोन्ही गटात नेमक्या कोणत्या कारणावरून वाद सुरू होता, याची माहिती अघ्याप मिळालेली नाहीयं.