मालेगाव : हवामान खात्याने (Weather Department) दिलेल्या अंदाजानूसार काल मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) नाशिकच्या नांदगाव (Nashik Nandgaon) तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी हा शेतकरी शेतात गेला होता, अंगावर वीज पडून जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. नाना गमन चव्हाण असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेतला असून काही शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. राज्यात काल अनेक जिल्ह्यात पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रात अंगावर वीज पडून अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने गरज असल्यास बाहेर पडा अशी शक्यता व्यक्त केली होती. तरी सुध्दा अनेक शेतकरी शेतात काम करत असताना दिसतात. तांदुळवाडी गावात जी काही घटना घडली आहे. ती अत्यंत भयानक घडली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाना गमन चव्हाण हे काढलेला कांदा पावसामुळे खराब होऊ नये म्हणून तो झाकण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळेस वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरु झाला. विजांच्या कडकडाट सुरु होता, त्यावेळी नाना गमन चव्हाण यांच्या अंगावर बीज पडली आणि त्यांचा जागीचं मृत्यू झाला आहे.
मागच्या आठ दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या काडणीला आलेल्या पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या फळबागा देखील उद्धवस्त झाल्या आहेत. शेतकरी सरकारकडून काही मदत जाहीर होणार का ? याकडे डोळे लावून बसले आहेत. आतापर्यंत काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी सरकारकडून करण्यात आली आहे.