नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव द्वितीय राजे होते. माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहचता येते, याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होतं, असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं. मध्यंतरी एका मंत्रीमहोदयानं त्यांच्या नेत्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं कोणी म्हणतं असेल, तर प्रत्येकाचाच त्याला विरोध असेल. माझाचं काय स्वतः शरद पवार हेही या गोष्टीला विरोध करतील. पण, सर्व व्यवस्थेची माहिती असलेलं नेतृत्व या भावनेनं म्हंटल असेल, तर जाण असणं, माहिती असणं हे कुणालाही वाईट नाही. असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्टपणे सांगितलं.
अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशीही तुलना होत नाही. होऊ शकणार नाही. तुलना करण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असं सगळ्या शिवभक्तांचं म्हणणंय.
अमोल कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अकारण रोजच्या राजकारणात ओढू नका, अशी हात जोडून विनंती आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी कोणतंही पद, कोणतीही खुर्ची, कोणतंही राजकारण माझ्यासाठी सगळं शून्य आहे.
उर्फी जावेदसारख्या प्रकरणांना हवा दिली जाते. त्यामुळं मुलभूत प्रश्न बाजूला राहतात. बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा या महत्त्वाच्या प्रश्नांना बाजूला ठेऊन आपण यावरच बोलत आहोत.
तरुणांना आपण मुलभूत प्रश्नांपासून बाजूला केलं तर मेंढांचा कळप तयार होऊ शकतो, अशी भीती अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.