आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर फोटो फाडून त्यांचा अपमान केलाय. बाबासाहेबांची डुप्लिकेट कॉपी करण्यासाठी त्यांनी आज महाडला मनुस्मृचीच दहन करण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाडांना जाब विचारणं अवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांचा मी निषेध करतो. आव्हाड यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून त्यांना अटक करावी अशी मागणी करणार आहे. लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी राज्यातील आंबेडकरी जनतेची मागणी आहे, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे आज महाडच्या क्रांती स्तंभ या ठिकाणी गेले होते. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश केला जाऊ नये, या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड चवदार तळ्याच्या परिसरात दाखल झाले. मनुस्मृती दहन त्यांनी या ठिकाणी केलं. यावेळी आव्हाडांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेलं. जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा निषेध केला जात आहे. ही अनावधानाने झालेली चूक असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे. मात्र आव्हाडांच्या कृतीचा विरोधकांकडून निषेध केला जात आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं पुण्यात आंदोलन सुरु आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पुण्यात वंचित बहूजन आघाडी आंदोलन करत आहे. जितेंद्र आव्हाडांना अटक झाली पाहिजे. बाबासाहेबांचा फोटो फाडला आहे. महाराष्ट्रात फिरताना त्यांना जाणवणार आहे काय परिणाम होतील ते, असं यावेळी वंचितचे कार्यकर्ते म्हणत होते.
जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीचा महायुतीच्या नेत्यांकडून निषेध केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. भाजप उद्या 30 मे रोजी राज्यभर आंदोलन आहे. भाजप जितेंद्र आव्हाडांना धडा शिकवणार आहे. जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. महाडच्या चवदार तळ्याजवळ आव्हाडानी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडलं आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.