नवी मुंबई : शहरात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट पाहायला मिळत आहे. शहरात प्रतिदिन सरासरी 50 नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील बराचसा ताण हलका झाला आहे. शिवाय शहरात रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहराला चांगलाच फटका बसला होता. मात्र, महापालिकेच्या नियोजनबद्ध उपाययोजनेने परिस्थिती लवकर आटोक्यात आणून अदयाप नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथिल होण्यास मदत झाली आहे. नागरिकांनी अशाच प्रकारे नियमांचे पालन करून रुग्ण संख्या आटोक्यात ठेवल्यास तिसऱ्या लाटेला रोखण्यास पालिका प्रशासनाला अधिक सोपं जाणार आहे. (Relaxation in corona restrictions in Navi Mumbai)
सध्या पालिकेची लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. प्राधान्याने 45 वर्षावरील नागरिकांना सुरक्षित करण्यात येत आहे. मात्र, राज्य शासनाकडून लस पुरवठा कमी होत असल्याने महापालिका हतबल झाली आहे. तरी संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यास पालिका सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त अभिजित बांगर करत आहेत. या पूर्वी दोन्ही लाटेत पालिकेने परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळल्याने आता तिसऱ्या लाटेचा तडाखा शहराला बसणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने शासनाने शहरातील करोना निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पुढील काळात रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
करोना निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नवी मुंबई परिवहन उपक्रमाने आपल्या बसची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यापूर्वी सराकारी कार्यालयात 50 टक्केच उपस्थितीसाठी परवानगी होती. मात्र, निर्बंध शिथिल झाल्यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालये 100 टक्के उपस्थितीत सुरु झाली आहेत. शहरातील बाजारपेठा दहापर्यंत सुरू राहणार आहेत. लोकल प्रवासासाठी परवानगी नसल्याने बसमध्ये गर्दी होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरात रुग्णसंख्येचा आकडा पुढील परस्थिती ठरवणार आहे.
Video | 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 6 August 2021#News | #NewsAlert | #NewsUpdates https://t.co/gLBdfpIuF1
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 6, 2021
संबंधित बातम्या :
नवी मुंबईत 90 केंद्रांवर लसीकरण होणार, 5 दिवसानंतर 5 हजार कोविशिल्ड, 5 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त
Relaxation in corona restrictions in Navi Mumbai