नवी मुंबईत धोकादायक इमारतीतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, नववर्षात वाढीव FSI ची भेट

| Updated on: Dec 11, 2020 | 1:05 PM

नवी मुंबईकरांना 4 एफएसआयची भेट मिळणार आहे, अशी माहिती आमदार म्हात्रे यांनी दिली. (Navi Mumbai dangerous buildings FSI increase)

नवी मुंबईत धोकादायक इमारतीतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, नववर्षात वाढीव FSI ची भेट
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडकोनिर्मित आणि खाजगी धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. या धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी सिडकोने 4 एफएसआयचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे येत्या दोन दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. (Navi Mumbai dangerous buildings FSI increase)

गेल्या कित्येक महिन्यांपासून नवी मुंबईत धोकादायक इमारतींचा प्रस्ताव ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईतील अनेक इमारती या धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे त्यांची पुर्नबांधणी करावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. अखेर या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन 4 एफएसआयची मागणी केली होती. या बैठकीनुसार सिडको आणि महापालिकेने शहरात कशाप्रकारे 4 एफएसआय देता येऊ शकतो याचं नियोजन केलं आहे. या प्रस्तावानुसार येत्या नवीन वर्षात नवी मुंबईकरांना 4 एफएसआयची भेट मिळणार आहे, अशी माहिती आमदार म्हात्रे यांनी दिली.

“नवी मुंबईत अडीच एफएसआयची मागणी केली होती. मात्र अडीच एफएसआयऐवजी मी त्यांच्याकडे 4 एफएसआयची मागणी केली. त्याची 16 नोव्हेंबरला बैठक झाली. त्यानंतर १० डिसेंबर यावर मुख्यमंत्र्यांची सही झाली. त्यानंतर आता सिडकोचे एमडी याबाबतचा प्रस्ताव देतील. त्यानंतर आता सिडकोकडून 4 एफएसआयमध्ये आपण कशाप्रकारे डेव्हलपमेंट करु शकतो. नेमका किती एफएसआय लागेल याबाबत समिती गठीत केली आहे. त्याचा अहवाल तयार केला आहे,” असे मंदा म्हात्रे म्हणाल्या.

“मी अनेकांशी याबाबतच चर्चा केली आहे. हा अहवाल सरकारकडे पाठवला जाईल, त्याला मान्यता मिळल्यानंतर इमारतींच्या पुनर्बांधणी केली जाईल. अडीच एफआयनंतर इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी कोणीही हात घातला नव्हता. त्यानतंर आता इमारतींच्या पुनर्बांधणी करण्यात येणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. (Navi Mumbai dangerous buildings FSI increase)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईतील कोविड टेस्टिंग घोटाळाप्रकरणी सरकारची कारवाई; एक अधिकारी निलंबित

मोगली धरण नवी मुंबई मनपाकडे हस्तांतरित करा; गणेश नाईक यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी