नवी मुंबई : नवी मुंबईत मर्सिडीज कारच्या धडकेत दोघा भावंडांच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रोहन अॅबोट हा प्रसिद्ध ॲबोट हॉटेलच्या मालकाचा मुलगा आहे. आरोपी रोहन अॅबोट चालवत असलेल्या मर्सिडीज कारच्या धडकेत पोलिसाच्या दोघा मुलांचा मृत्यू झाला होता. तर मर्सिडीज कार चालकाला फाशी देण्याची मागणी कटुंबीय करत आहेत. (Navi Mumbai Mercedes Car Hit and Run Hotelier Son Arrested)
नवी मुंबईतील पामबीच रस्त्यावर अपघात करून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी ताब्यात घेतले. शनिवार रात्री दीड वाजता पामबीच मार्गावर दुचाकीला धडक देऊन आरोपी पळून गेला होता. रोहन अॅबॉर्ट (वय 32) याला पोलिसांनी अटक करुन कोर्टात हजर केले असता बेलापूर कोर्टातून आरोपीला जामीन मिळाला आहे. कारच्या धडकेत अक्षय गमरे आणि संकेत गमरे या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला होता. मयत तरुण मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याची मुलं आहेत.
बाईकने घरी येताना मर्सिडीजची धडक
रोहन हा वाशीतील अॅबॉर्ट हॉटेलच्या संचालकचा मुलगा असून त्याने मर्सडिज कारने दोघांना उडवले होते. या अपघातात अक्षय गमरे आणि संकेत गमरे या दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघे भाऊ स्क्रीन प्रिंटिंगचे काम करून बेलापूर येथून तुर्भे सेक्टर 20 येथील राहत्या घरी दुचाकीने येत होते.
यावेळी एमएच 46 एबी 4023 क्रमांकाच्या भरधाव मर्सडिज कारने दोघांना धडक दिली. मुंबई एल टी मार्ग पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याची ही दोन्ही मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एकाचवेळी दोन्ही मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आरोपी कारचालकाला फाशी देण्याची मागणी
मुलांचा अपघात करण्याऱ्याला फाशीची द्या अशी मागणी मुलांच्या आईने केली आहे. तर दोन्ही मुले एकाच वेळी गेल्याने त्यांच्या आईला शोक अनावर झाला असून मला मोठा धक्का बसला आहे. मला अपंग करा, मला मरून जाऊ दे असे उद्गार मुलाच्या आईच्या तोंडून ऐकायला येत आहे.
संबंधित बातम्या
Kusal Mendis | कारखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू, श्रीलंकन क्रिकेटपटू कुसल मेंडिसला अटक
(Navi Mumbai Mercedes Car Hit and Run Hotelier Son Arrested)