NMMC Election 2022 Ward 20: नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये माजी महापौरांच्या पत्नीचे नगरसेवकपद सुरक्षित

| Updated on: Aug 26, 2022 | 9:49 PM

प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुधाकर संभाजी सोनवणे हे अनेकवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी  रंजना सुधाकर सोनवणे या प्रभाग क्रमांक 20 मधून सातत्याने नगसेविका म्हणून निवडून येत आहेत. त्यांचा प्रभाग हा रबाळे परिसरात येतो. या प्रभागावर रंजना सोनावणे यांची मजबूत पकड आहे. 

NMMC Election 2022 Ward 20: नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये माजी महापौरांच्या पत्नीचे नगरसेवकपद सुरक्षित
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या एका प्रभागात  (Navi Mumbai Municipal Corporation) आता तीन नगरसेवक प्रतिनीधीत्व करणार आहेत. मात्र, अनेक प्रभागातील विद्यमान नगरसेवकांना याचा फटका बसण्याची शक्यता फार कमी आहे. या पैकी एक आहेत. प्रभाग क्रमांक 20 मधील नगरसेविका रंजना सुधाकर सोनवणे. रंजना या प्रभाग क्रमांक 19 चे नगरसेवक आणि माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या पत्नी आहेत.

अशी आहे नवी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत

प्रभाग क्रमांक 19 मध्ये सुधाकर संभाजी सोनवणे हे अनेकवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी  रंजना सुधाकर सोनवणे या प्रभाग क्रमांक 20 मधून सातत्याने नगसेविका म्हणून निवडून येत आहेत. त्यांचा प्रभाग हा रबाळे परिसरात येतो. या प्रभागावर रंजना सोनावणे यांची मजबूत पकड आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

नवीन प्रभाग रचनेनुसार एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 20 मध्ये आता प्रभाग क्रमांक 20 अ, प्रभाग क्रमांक 20 ब आणि प्रभाग क्रमांक 20 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 20 अ हा OBC उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 19 ब हा सर्व साधारण महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 20 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे रंजना सोनावणे या प्रभाग क्रमांक 20 ब किंवा प्रभाग क्रमांक 20 क या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहू शकतात. मात्र, प्रभाग रचनेचा फटका त्यांना बसू शकतो. कारण त्यांच्या प्रभाग रबाळे ऐवजी कौपरखैरणे, खैरणे गाव आणि बोनकोडे गावात गेला आहे.

प्रभाग क्रमांक 20 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 20 ची एकूण लोकसंख्या 27905 इतकी आहे. अनुसूचित जातीचे 1196 मतदार आहेत. तर 421 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

व्याप्ती – कोपरखैरणे सेक्टर- 11, सेक्टर- 12 गा.वि.यो. (भाग), सेक्टर- 13 खैरणे गांव, 1 बोनकोडे गाव व इतर.

उत्तर – सेक्टर- 13 ओव्हरहेड टँक जवळील जंक्शन पुढे पूर्वेस श्री लक्ष्मीपती निवास सेक्टर-12 बी. पुढे दक्षिणेस भरत नाईक यांचे घर सेक्टर- 12 सी, पुढे पूर्वेस पांडुरंग निवास सेक्टर 12 सी पुढे दक्षिणेस व्हीगो पॅराडाइस बिल्डींग बोनकोडे गाव, पुढे पुर्वेस ओव्हरहेड ब्रिज ठाणे-बेलापूर रस्त्यापर्यंत. पूर्व-ठाणे-बेलापूर महामार्ग ओव्हरहेड ब्रीज (साई सुवर्ण अपार्टमेंट प्लॉट नं. 5, से. 19 समोरील नाल्यापर्यंत).

दक्षिण- खैरणे नाला कांचनगंगा अपार्टमेंट सं. 11 नाल्या लागत ठाणे-बेलापूर महामार्ग (साई सुवर्ण अपार्टमेंट प्लॉट नं. 5, से. 19)

पश्चिम- सेक्टर 13 ओव्हरहेड टँक जवळील जंक्शन पुढे दक्षिणेस खैरणे नाला (कंचनगंगा अपार्टमेंट से. 11 पर्यंत).

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष