नवी मुंबई : येत्या सोमवारपासून नवी मुंबईतील शाळांची घंटा वाजणार आहे. नवी मुंबईतील काही खासगी शाळा येत्या 8 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सुरु राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता सर्व पूर्ववत होत असून अनेक ठिकाणच्या शाळा पुन्हा सुरु केल्या जात आहे. (Navi Mumbai Private school Reopen)
काही दिवसांपूर्वी पनवेल महानगरपालिकाने इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरु करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं होतं. त्यानुसार महापालिकेच्या सर्व शाळा गेल्या 27 जानेवारीपासून सुरु करण्यात आल्या होत्या. यानंतर आता इतर खासगी माध्यमांच्या शाळांनीही प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनेक खासगी शाळांनी याबाबत पालकांना मॅसेज पाठवत काही सूचना केल्या आहेत. एका सीबीएसई शाळेने पालकांना पाठवलेल्या मॅसेजनुसार, येत्या 8 फेब्रुवारीपासून शाळा सुरु करण्यात येत आहे. शाळांचा वेळ आणि टाईमटेबल काही दिवसांनंतर शेअर केले जाईल. विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा देण्यात येणार आहे. बस सुविधेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी बसचा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत 1 ते 23 हे हजेरी क्रम असलेले विद्यार्थी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहतील. त्याचदरम्यान 24 पासून पुढे हजेरी क्रमांक असलेले विद्यार्थी घरातून ऑनलाईनद्वारे शाळेत उपस्थित राहतील.
तर 24 पासून पुढे हजेरी क्रमांक असलेले विद्यार्थी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी प्रत्यक्ष शाळेत हजेरी लावतील. त्यादरम्यान 1 ते 23 हे हजेरी क्रम असलेले विद्यार्थी ऑनलाईनद्वारे शाळेत उपस्थित राहतील.
दरम्यान सर्व पालकांनी त्यांच्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी दिलेल्या संमती फॉर्मची हार्डकॉपी शाळेत पाठवणे गरजेचे आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहेत.
मुंबई महापालिकेकडून शाळांबाबत प्रसिद्धीपत्रक जारी
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने 5 वी ते 8 वी इयत्तेची शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील शाळा उघडण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली असली तरी मुंबईतील शाळा पुढील आदेशापर्यंत सुरु होणार नाहीत, अशी माहिती मुंबई महापालिकेने प्रसिद्धी पत्रक जारी करत सांगितली आहे. (Navi Mumbai Private school Reopen)
CBSE Exam Date Sheet 2021: सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकाची रमेश पोखरियालांकडून घोषणा, टाईम टेबल कुठे पाहणार?https://t.co/9qasMm21zj#cbse | #rameshpokhriyal | #cbsedatesheet | #cbseexam2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 2, 2021
संबंधित बातम्या :
कोरोना लसीचा काहीच भरोसा नाही? लस घेतली तरी कोरोना झाला! नेमकं काय काय झालं?
ह्या बातमीचा महाराष्ट्राला अभिमान, लातुरात हळदी कुंकवाला तृतीय पंथी !