नवी मुंबई : ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर कोणतंही शिखर सर करता येते. या वाक्याला साजेशी कामगिरी केवळ सहा वर्षीय चिमुकलीने करुन दाखवलेय. साईशा मंगेश राऊत हिने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपल्या वडिलांसह एवरेस्ट बेस कॅम्प सर करण्याचा पराक्रम केलाय. ज्या वयात लहान मूलं विविध खेळ खेळत असतात, त्याच वयात साईशाने एव्हरेस्ट चढण्याचा निर्धार केला.
यासाठी साईशाने प्रचंड मेहनत घेतली. रोज 14 किलोमीटर सायकलिंग 12 किलोमीटर वॉकिंग 1 तास स्विमिंग आणि योगा करत साईशाने स्वतःला खंबीर केले. मायनस 10 ते 20 टेम्परेचरमध्ये रोज 10 किलोमीटरची चढाई करुन साईशाने एव्हरेस्टला गवसणी घातली. तिच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.
नवी मुंबईतील साईशा राऊत या सहा वर्षीय चिमुकलीने आपल्या वडिलांसह माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मिशन पूर्ण केल्याची किमया केली. विविध संकटावर मात करत साईशाने ही विशेष कामगिरी केली.
साईशा राऊत म्हणाली, तिथं तापमान मायनस होतं. आम्ही नऊ दिवस ट्रॅकिंग करत होतो. वर चढाव लागत होतं. दरम्यान बर्फवृष्टी झाली. तापमान मायनस २० होतं. वर चढत असताना मी नाचत होती. मज्जा करत होती.
एव्हरेस्टला जाण्यासाठी तयारी कशी केली. यावर बोलताना साईशा म्हणाली, १४ किलोमीटर सायकलिंग आणि १२ किलोमीटर वॉकिंग करत होती. स्विमिंगपण करत होती. मे महिन्यात रशियातील माऊंट एलब्रशला जाणार आहोत. तिथं जाण्यासाठी तयारी करत आहे.
साईशा ही छोटीसी मुलगी. पण, तिच्या बाबांनी तिची तयारी करून घेतली. ते स्वतः तिच्या सोबत होते. तिला प्रोत्साहन देत होते. त्यामुळे साईशाचा हा प्रवास सुकर झाला. घरच्यांनी योग्य साथ दिल्यास मुलं नवीन काहीतरी नक्कीच करू शकतात. त्यांना योग्य पद्धतीनं सांगणं तेवढं आवश्यक असते. मग, मुलं आपोपार कामाला लागतात. ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यात ती यशस्वी झाली.