नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटमध्ये 750 गाड्यांच्या आवक झाली असून 3 लाख कोथिंबीर जुडी बाजारात आली आहे. परंतू नाशिक परिसरातून आलेल्या कोथींबीर जुड्या भिजल्याने त्याची विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे लाखो जुड्या कोथींबीर बाजार आवारात पडून असून जुड्या सुकवण्यासाठी व्यापाऱ्यांनी ओपन शेडमध्ये पसरवून ठेवल्या आहेत. कोथींबीर जुडी दर 5 रुपये असला तरी ग्राहक खरेदी करत नसल्याने या जुड्या कचऱ्यात जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
श्रावण सुरु झाल्यापासून चांगल्या प्रमाणात आवक आणि ग्राहक बाजारात होते. मात्र, सरासरी 700 गाड्या भाजीपाला सहज विक्री होत असल्याने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल मागवला. परिणामी बाजारात ग्राहक कमी होऊन भरपूर शेतमाल पडून राहिल्याचे पाहायला मिळाले. शिवाय, बाजार भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून सर्व भाज्या 20 रुपये प्रतिकिलो पेक्षा कमी दराने विकल्या जात आहेत. तर, एकीकडे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, ऐन श्रावण महिन्यात भाज्यांच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
टोमॉटो – 8 रुपये,
काकडी – 10 रुपये ,
भेंडी – 4 रुपये,
दुधी – 12 रुपये,
वांगी – 14 रुपये,
फ्लॉवर – 2 रुपये,
कोबी – 5 रुपये,
कारली – 12 रुपये,
मेथी जुडी – 20 रुपये,
कोथांबीर जुडी – 5 रुपये
श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार आल्याने अनेकांचा उपवास असतो. संध्याकाळी उपवास सोडताना जेवणात कमीत कमी पाच भाज्यांचा समावेश केला जातो. त्यामुळे थोड्या-थोड्या प्रमाणात विविध भाज्या खरेदी केल्या जातात. बहुतांश पालेभाज्यांना प्राधान्य दिले जात असल्याने मागणीत वाढ झाली होती. त्यामुळे पालेभाज्या महागल्या होत्या.अळूच्या 10 ते 15 पानाची जुडी 50 रुपयांना विकल्या गेल्या.
एपीएमसी मार्केटमधील कांदा-बटाटा मार्केट व्यतिरिक्त इतर सर्वच मार्केटमध्ये खरेदीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. श्रावण महिन्यात अधिक लोक मांसाहार बंद करुन शाकाहाराला पसंती देत असतात. त्यामुळे अन्नधान्यासह सर्वच मार्केटमध्ये गर्दी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर दरवर्षी संपूर्ण श्रावण महिना भाजीपाला आणि फळ खरेदीला ग्राहक पसंती देत असल्याचं व्यापारी सांगत आहेत.
श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात गर्दी; इतर भाज्यांचे दर स्थिर, पालेभाज्या मात्र महागल्या https://t.co/UbsMSijfP2 @OfficeofUT @Navimumpolice @AjitPawarSpeaks #NaviMumbai #APMCMarket #vegetables #VegetablesRate #ShravanMonth
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
संबंधित बातम्या :
श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये “कही खुशी कही गम”