नवी मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच आता नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. मंदा म्हात्रे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. (Chhatrapati Sambhaji Maharaj Name to Navi Mumbai Municipal Corporation headquarters demand from BJP MLA Manda Mhatre)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अजित पवारांना पत्र
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरणाचा मुद्दा गाजत असतानाच आता भाजपा तर्फे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या नामांतरणाची मागणी केली जात आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. तसेच याबाबत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडेही मागणी केली आहे.
“संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही”
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नवी मुंबईकरांना कळावा या दृष्टीने ही मागणी केली आहे. तसेच संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही, अशी प्रतिक्रिया आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
शिवप्रेमी, शंभुप्रेमींच्या संघटनांचा नामकरणाला पाठिंबा
विशेष म्हणजे शिवप्रेमी, शंभुप्रेमींच्या संघटनांनी यांनी याबाबतचा नामकरणाला पाठिंबा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.
मोठी बातमी: यंदा सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा; वाचा राज्य सरकारची संपूर्ण नियमावली https://t.co/9b7pXRgxva #GaneshUtsav2021 #ganpati #ganpatibappamorya #MahaVikasAghadi #Festival
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2021
(Chhatrapati Sambhaji Maharaj Name to Navi Mumbai Municipal Corporation headquarters demand from BJP MLA Manda Mhatre)
संबंधित बातम्या :
Coronavirus | नवी मुंबईकरांना मोठा दिलासा, शहरात डेल्टा प्लस व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही
नवी मुंबईच्या मसाला मार्केटमधील अतिधोकादायक इमारतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, दुर्घटनेची शक्यता