पनवेल : कोकण विभागातील महापुरामुळे उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन 7 अधिकाऱ्यांना 3 आठवड्यांसाठी चिपळूण, खेड आणि महाड नगरपरिषद कार्यक्षेत्रात वर्ग करण्यात आलेय. त्यांना आपत्ती व्यवस्थापन कामाची जबाबदारी देण्यात आलीय. या अधिकाऱ्यांमध्ये पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका,ठाणे महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका आणि नगरपरिषद महासंचालनालय मुंबई कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार, वसई विरार महानगरपालिकेचे उपायुक्त नयना ससाने, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे , पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त रंजना गगे , श्रीराम पवार, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई येथील किरणराज यादव, उपायुक्त, योगेश कडुसकर, उपायुक्त नगरपरिषद प्रशासन अशी या 7 अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात महापुरामुळे उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती विचारात घेऊन, स्थानिक नगरपरिषद कार्यक्षेत्रात नागरी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन कार्याचे समन्वयन, सर्व नागरी सेवांची उपलब्धता सुनिश्चित करणे, स्वच्छता व अनुषंगिक बाबींचा समन्वय साधणं अशी कामं दिलीत. त्यांना या कामासाठी तीन आठवड्यांसाठी सेवा आदेश करत वर्ग करण्यात आले आहे.
1) संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महानगरपालिका
2) सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका
3) नयना ससाणे, उपायुक्त, वसई विरार महानगर पालिका
4) रंजना गगे, उपायुक्त, पुणे महानगरपालिका.
5) श्रीराम पवार, उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
6) किरणराज यादव, उपायुवत, नगरपरिषद प्रशासनसंचालनालय, मुंबई.
7) योगेश कडुसकर, उपायुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई
या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्यां नियंत्रणात राहून ही कामे पार पाडायचे आहेत. स्थानिक अधिकारी, नगरपरिषदेचे संबंधित मुख्याधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून तसेच आंतर विभागीय समन्वय सुनिश्चित करून आपत्ती व्यवस्थापनाचे काम पार हे अधिकारी पाडणार आहेत. तसेच आपल्या कामाचे अहवाल संबंधित जिल्हाधिकारी व आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडे सादर करावे लागणार आहे.