नवी मुंबई : सिडको महामंडळाकडून कोव्हिड योद्ध्यांसाठी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर गृहयोजना जाहीर करण्यात आली आहे. डॉक्टरांसह गणवेशधारी कर्मचार्यांसाठी ही गृह योजना राबवण्यात येत आहे. या गृहयोजनेत जवळपास साडे चार हजार सदनिका आहेत. मात्र, गुरुवारपर्यंत पाच हजार कोव्हिड योद्ध्यांनी नोंदणी केली आहे. शिवाय आणखी महिन्याभरात किती जणांची नोंदणी होईल याचा अंदाज बांधणे कठीण असले तरी त्यामुळे कोव्हिड योद्ध्यांना सुद्धा सोडत पद्धतीला सामोरे जाऊन आपले नशीब अजमावे लागणार आहे.
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणारे आणि कोविड योद्धा म्हणून राज्य सरकारने निर्देशीत केलेल्या घटकांसाठी सिडकोने ही विशेष गृहयोजना आणली आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी आदींचा यात समावेश आहे. या योजनेअंतर्गत तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
यातील 1,088 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित 3,400 सदनिका सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित आहेत. या योजनेतील घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
त्यानुसार, या योजनेअंतर्गत पाच दिवसांत पाच हजार जणांनी घरासाठी ऑनलाईन नोंदणी केल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 7 सप्टेंबर 2021 असून 17 सप्टेंबर 2021 रोजी या घरांसाठी ऑनलाईन सोडत काढली जाणार आहे.
पनवेल मनपा सुरक्षा रक्षक आणि घरकाम करणाऱ्या महिलांचे लसीकरण करणारhttps://t.co/XmOkBZWlFD#Panvel #SucurityGuard #CoronaVaccine #VaccinationDrive
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 19, 2021
संबंधित बातम्या :
बई APMC च्या पाचही बाजारपेठांत लवकरच मराठीचा वापर होणार; आमदार शशिकांत शिंदेंचा पवित्रा
नवी मुंबईत महिन्याभरापासून कोरोना रुग्ण पन्नाशीतच; परिस्थिती आटोक्यात मात्र कोरोनामुक्ती कधी?