नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट वर नवी मुंबई पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. नवी मुंबई परिवहन कार्यालयाकडे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी स्वतः हजर न राहता सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट मार्फत अधिकचे पैसे देऊन लर्निंग लायसन्स काढण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानुसार काही सायबर कॅफेमध्ये (Cybercafe) आधार कार्ड घेऊन लर्निंग लायसन्स काढण्याची मागणी केली असता कोणतीही पडताळणी न करता एजंटच लर्निंग लायसन्सची परीक्षा देऊन लायसंस काढून देत असल्याचे निदर्शनास आल्यावर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारी नुसार पोलिसांनी गैरप्रकारे लर्निंग लायसन्स काढून देणाऱ्या सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट विरोधात गुन्हा दाखल केला असून अनेकांना नोटीस देण्यात आलेय.
नवी मुंबईतील सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट वर नवी मुंबई पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. नवी मुंबई परिवहन कार्यालयाकडे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी स्वतः हजर न राहता सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट मार्फत अधिकचे पैसे देऊन लर्निंग लायसन्स काढण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या.
काही सायबर कॅफे मध्ये आधार कार्ड घेऊन लर्निंग लायसन्स काढण्याची मागणी केली असता कोणतीही पडताळणी न करता एजंटच लर्निंग लायसन्सची परीक्षा देऊन लायसंस काढून देत असल्याचे निदर्शनास आल्यावर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
आलेल्या या तक्रारींनुसार पोलिसांनी गैरप्रकारे लर्निंग लायसन्स काढून देणाऱ्या सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट विरोधात गुन्हा दाखल केला असून अनेकांना नोटीस देण्यात आली आहे.