कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, पण नवी मुंबईत अनेक नागरीक लसीकरणापासून वंचित

| Updated on: Jun 27, 2021 | 3:25 PM

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असली तरी गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या पुन्हा शंभरी पार गेली आहे (Many citizens in Navi Mumbai are deprived from vaccination).

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, पण नवी मुंबईत अनेक नागरीक लसीकरणापासून वंचित
अमेरिकेच्या अभ्यासातून आनंदाची बातमी; फायझर आणि मॉडर्नाची लस कोरोनावर 91 टक्के प्रभावी
Follow us on

नवी मुंबई : शहरात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असली तरी गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या पुन्हा शंभरी पार गेली आहे. शिवाय डेल्टा प्लसचा धोका राज्यात कूच करत आहे. राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 22 रुग्ण आहेत. यापैकी 1 रुग्ण हा नवी मुंबईत सापडला आहे. संबंधित रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात लसीकरणावर भर देऊन अधिकाधिक नागरिकांना सुरक्षित करण्याचं चंग बांधल्याचे सांगण्यात येत आहे (Many citizens in Navi Mumbai are deprived from vaccination).

राज्यात काल (26 जून) दिवसभरात सर्वाधिक लसीकरण झालं. पण नवी मुंबईत अनेक नागरीक अजूनही लसीकरणापासून वंचित असल्याचं दिसत आहे. नवी मुंबईत एकूण 59 लसीकरण केंद्र सुरु असली तरी आज फक्त तीन रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु आहे. तसेच गेल्या तीन दिवसांपासून लस उपल्बध नसल्याने लसीकरण बंद होते (Many citizens in Navi Mumbai are deprived from vaccination).

नवी मुंबई एपीएमसीत लसीकरणाकडे दुर्लक्ष

मुंबई एपीएमसी बाजारपेठ ही आशिया खंडातील सर्वात मोठी एपीएमसी असल्याची ख्याती आहे. पण या बाजारपेठेतही लसीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रतिदिन लाखो लोकांची वर्दळ असलेल्या एपीएमसीमधील धान्य आणि भाजीपाला या दोन मार्केटमध्ये केवळ लसीकरण केंद्र सुरु केली गेली. पण या ठिकाणी अनेकदा लसपुरवठाच होत नसल्याने निम्याहून अधिक बाजार घटक हे लसीपासून वंचित असल्याचे समोर येत आहे. तसेच लसीकरणासह सध्या अँटीजेन आणि आरटीपीसीआर तपासण्या कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेचंही दुर्लक्ष

दरम्यानच्या काळात बाजार समिती सचिव आणि सभापती यांनी बाजार समितीतील पाचही मार्केटसाठी भव्य लसीकरण केंद्र सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यालाही अद्याप मुहूर्त मिळेना. त्यामुळे बाजार समिती प्रशासन आणि महापालिका या मोठ्या बाजारपेठेबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. तसेच बाजार समिती प्रशासनाला बाजार घटकांचे काही पडले नसल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्त कशा पद्धतीने परिस्थिती हाताळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मार्केटमध्ये मजुरांचं वास्तव्य वाढलं

नवी मुंबई शहर शासनाने निर्देशित केलेल्या दुसऱ्या टप्प्यात असल्याने 7 जून पासून शहरातील सर्वच आस्थापना सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी सुरु झाली. बाजारत नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मुंबईसह उपनगरातील लोक या बाजारपेठेत येत असतात. शिवाय टाळेबंदी काळात गावी गेलेले मजूर पुन्हा मार्केटमध्ये परतले आहेत. त्यामुळे फळ आणि भाजीपाला मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात मजुरांचे वास्तव्य वाढले आहे. तर तिसरी लाट लवकरच येणाची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर फिरू नये, नियमांचे पालन करावे अन्यथा तिसऱ्या लाटेला मोठे आमंत्रण ठरेल. त्यामुळे कोरोना संपला नाही हे लक्षात घेऊन नागरिकांचे वागणे असावे, अशी विनंती नवी मुंबई महापालिकेने केली आहे.

नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद कमी

लसीकरण फार महत्वाचे असून कोरोनाला हलक्यात घेऊन नये, असे आवाहन यापूर्वी महापालिकेने केले होते. शिवाय पालिकेने सुद्धा तिसऱ्या लाटे विरोधात जोरदार तयारी केली आहे. संबंधित सर्व उपाययोजना सुरु आहेत. त्यात महत्वाचे लसीकरण असल्याने शहरात 30 ते 44 आणि 45 वर्ष अधिक वयोगटातील लोकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. मात्र, पूर्वीपेक्षा आता नागरिकांचाच प्रतिसाद लसीकरणासाठी कमी झाल्याचे दिसत आहे.

लसीकरण करा, महापालिका आयुक्तांचं आवाहन

कोवॅक्सीन आणि कोव्हिशिल्ड यामध्ये कोणती लस प्रभावी या चर्चा करण्यापेक्षा मिळेल ती लस घेऊन स्वतःला सुरक्षित करण्याचे तसेच नवीन येत असलेल्या डेल्टा प्लस संक्रमणापासून दूर राहण्याचे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. शिवाय आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा, डबल मास्क वापरा, सर्व नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

संभाव्य तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलांसाठी गुड न्यूज, पुण्यात सीरम Covovax ची चाचणी सुरु करणार

भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका किती? नवे चकित करणारे खुलासे