पटोले, चव्हाण, जगताप यांच्यावर ‘त्या’ आंदोलनाचे गुन्हे दाखल केले का?; बाईक रॅलीवर नरेंद्र पाटील ठाम

| Updated on: Jul 16, 2021 | 6:06 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं. (maratha akrosh morcha holds bike rally in navi mumbai)

पटोले, चव्हाण, जगताप यांच्यावर त्या आंदोलनाचे गुन्हे दाखल केले का?; बाईक रॅलीवर नरेंद्र पाटील ठाम
नरेंद्र पाटील
Follow us on

नवी मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केलं. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले का?, असा सवाल करतानाच आपण कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी 18 जुलै रोजी बाईक रॅली काढणारच, असं मराठा आक्रोश मोर्चाचे नेते नरेंद्र पाटील यांनी आज स्पष्ट केलं. (maratha akrosh morcha holds bike rally in navi mumbai)

नरेंद्र पाटील यांनी आज नवी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा सवाल केला. सोलापूर येथील मोर्चानंतर नवी मुंबईत या बाईक रॅलीचे मराठा आक्रोश मोर्चाने आयोजन केले आहे. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच ही रॅली काढली जात आहे. सोलापूर व अन्य ठिकाणी मराठा आक्रोश मोर्चाच्या कार्यर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या नाना पटोले अशोक चव्हाण, भाई जगताप यांच्यावर गुन्हे दाखल केले का? याबाबत पोलीस महासंचालकांनी माहिती दयावी, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

रॅली निघणारच

आम्हाला परवानगी नाकारली तरी आम्ही बाईक रॅली काढणारच आहोत. येत्या 18 जुलै रोजी नवी मुंबईतून बाईक रॅली काढली जाणार आहे. 18 जुलै रोजी सकाळी 9 वाजता ऐरोली ते माथाडी भवन वाशीपर्यंत बाईक रॅली काढली जाईल. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकारचं या बाईक रॅलीतून लक्ष वेधण्यात येणार आहे, असं सांगतानाच सोलापुरात 4 जुलै रोजी बाईक रॅली काढण्यात आली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

रॅलीत माथाडी कामगारही

सोलापूरमध्ये 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला माथाडी युनियन, माथाडी पतपेढी, माथाडी ग्राहक सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर येथील मोर्चा पाहून प्रेरित होऊन नवी मुंबईतील बाईक रॅलीत सर्व कर्मचारी, माथाडी कामगार, मराठा आक्रोश मोर्चाचे कार्यकर्ते व मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे विविध जातीधर्माचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अशी निघणार बाईक रॅली

ही बाईक रॅली ऐरोली सेक्टर-16 च्या गार्डनमधील स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन निघणार आहे. सेक्टर-16 पासून ती पुढील मार्गाने जाणार आहे.

1) मुलुंड ब्रिज सर्कल, ऐरोली

2) रेल्वे ब्रिज खालून ठाणे-बेलापूर रोडकडे

3) ठाणे-बेलापूर रोड मार्गे घणसोली डी मार्टकडे

4) डी मार्टकडून राजिंदर आश्रम चौक

5) राजिंदर आश्रम चौकातून कोपरखैरणे मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी

6) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून या चौकातुन अरँजा चौक

7) अरेंजा चौकातून वाहतूक पोलीस चौकी सिग्नलपासून माथाडी भवन (maratha akrosh morcha holds bike rally in navi mumbai)

 

संबंधित बातम्या:

माजी गृहमंत्री अनिल देशुमखांवर ईडीची मोठी कारवाई, देशमुखांच्या कोण-कोणत्या संपत्तीवर टाच?

काँग्रेस स्वबळावर लढणार?, विजय वडेट्टीवार म्हणतात, हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज नाही

आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते; हसन मुश्रीफ यांचा ईडीला सवाल

(maratha akrosh morcha holds bike rally in navi mumbai)