मराठा क्रांती मोर्चातर्फे विजय वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, वाशी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन

| Updated on: Sep 03, 2021 | 10:59 PM

जर या प्रकरणाची येत्या दोन दिवसात दखल घेऊन विजय वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली नाही तर मराठा क्रांती मोर्चातर्फे मातोश्री बाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चातर्फे विजय वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, वाशी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन
मराठा क्रांती मोर्चातर्फे विजय वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Follow us on

नवी मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान आणि दोन समाजात तेढ निर्माण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा तर्फे वाशी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट 2021 रोजी विजय वडेट्टीवार यांनी भाषण करताना देशाच्या संविधानिक पदावर कार्यरत खासदार छत्रपती संभाजीराजे यांना उद्देशून काठी चालविण्याची धमकी देऊन खासदार पदाचा अपमान केला. तसेच मराठा आणि ओबीसी समाजात तेढ होऊन शांतता भंग होईल असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. (Maratha Kranti Morcha demands to file a case against Vijay Vadettiwar)

योग्य कलमाखाली कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

विजय वडेट्टीवार यांचे सदर वक्तव्य समाज माध्यमांमध्ये पसरले आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये योग्य कलमाखाली कायदेशीर कार्यवाही करावी, अशी विनंती मराठा क्रांती मोर्चा तर्फे करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जर तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली जाते तर मग खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल विजय वडेट्टीवार यांना अटक का केली जात नाही?, असा सवालही मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

वडेट्टीवार यांना अटक न केल्यास मातोश्रीसमोर आंदोलनाचा इशारा

जर या प्रकरणाची येत्या दोन दिवसात दखल घेऊन विजय वडेट्टीवार यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली नाही तर मराठा क्रांती मोर्चातर्फे मातोश्री बाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चातर्फे देण्यात आला आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देताना ‘मराठा क्रांती मोर्चा’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अंकुश कदम, बाळासाहेब शिंदे, मयुर धुमाळ, विनायक जाधव, शुभम पाटील, संकेत निवडुंगे, सुरेश सावंत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. (Maratha Kranti Morcha demands to file a case against Vijay Vadettiwar)

इतर बातम्या

मनिका बत्राने टेबल टेनिस प्रशिक्षकावर केला मॅच फिक्सिंगचा आरोप, म्हणाली ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये सामना हरण्यास सांगितले!

सीबीएसईने 2021-22 टर्म 1 बोर्ड परीक्षेसाठी नमुना पेपर जारी, 10 वी, 12 वीचे विद्यार्थ्यांनी असे करा डाउनलोड