नवी मुंबई : कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी आज पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. वारंवार पत्र व्यवहार करुनही व्यापारी 50 किलो पेक्षा जास्त माल मागवतात. कित्येक वेळा सर्व पदाधिकारी, नेते आणि कामगार यांच्या बैठक होऊन सुद्धा व्यपारी जास्त माल मागवतात. जोपर्यंत 50 किलोपेक्षा कमी माल बाजार आवारात येणार नाही तोपर्यंत माथाडी कामगार माल खाली करणार नाही, असा पवित्राच माथाडी कामगारांनी घेतला आहे. सकाळपासून कांदा बटाटा मार्केट बंद करुन माथाडी कामगार आंदोलन सुरू केला आहे.
वारंवार मागणी करुनही दुर्लक्ष केल्याने आंदोलन
वाहतूक करण्यात येणाऱ्या मालाचे वजन 50 किलोपेक्षा अधिक नसावे ही मागणी वारंवार करुन देखील अधिक वजनाच्या गोणी येत असल्याने माथाडी कामगार आज अधिकच संतापले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच माथाडी कामगारांनी काम बंद केले आहे. 50 किलोपेक्षा अधिक क्षमतेच्या गोणी मालाची वाहतूक करु नये असा शासनाचा जीआर असताना एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत. फळ, भाजीपाला, मसाला आणि धान्य मार्केटमध्ये या नियमाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतू कांदा बटाटा मार्केटमध्ये हा नियम लागू न करण्यात आल्याने माथाडी कामगारांनी संताप व्यक्त केला.
काम बंद केल्याने हजारो टन माल गाड्यांमध्ये असाच पडून
जवळपास 150 ट्रक मालाची आवक कांदा बटाटा मार्केटमध्ये झालीये. सकाळपासूनच काम बंद केल्याने हजारो टन माल गाड्यांमध्ये असाच पडून राहिला. काही व्यपाऱ्यांचा माल उचलण्यास नकार देऊन माथाडी कामगारांनी काम बंद केले आहे. एपीएमसी प्रशासनाने त्वरित या निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा माथाडी कामगारांनी दिला आहे.
शासनाच्या जीआरनुसार 50 किलो वजनाचा गोणी अपेक्षित असताना काही व्यपाऱ्यांकडे 60 ते 65 किलो वजनाचा माल येत आहे. गेली दोन वर्षपासून संबंधित घटकांशी वारंवार बैठक घेऊन देखील शासन निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे माथाडी कामगारांनी सांगितले.
सणासुदीमुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी वाढली; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळण्याची भीती! https://t.co/GcBrg2Lb2G @Navimumpolice @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 #NaviMumbai #APMCmarket #coronavirus #CoronaThirdWave #DeltaPlusVariant
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2021
संबंधित बातम्या :
मुंबई एपीएमसीत 4 वर्षातील विक्रमी भाजीपाल्याची आवक, दरामध्ये मोठी घसरण
नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येबाबत दिलासा; मात्र एपीएमसी मार्केटमुळे प्रशासनाची धाकधूक वाढली