नवी मुंबई : कोरोना नियमात शिथिलता दिल्याने यंदा गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. गणरायापाठोपाठ रविवारी घरोघरी गौराईचे आगमन झालेल्या गौरींचे भाऊ गणपतीसोबत विसर्जन होणार आहे. सोमवारी गौरी पूजनासाठी नवी मुंबई शहरातील आगरी समाजातील सासुरवाशीण आणि माहेरवाशिणांच्या उत्साहाला उधाण आले होते. कोरोना संसर्गाांचे भान राखून काही माहेरवाशिणींनी गौराईचे दर्शन घेतले.
आग्रोळी गावातील स्वरुप पाटील यांच्या घरी गौरीचे आगमन झाले आहे. गेले 50 वर्ष त्यांच्या घरी गौरी येत असल्याचे ते सांगतात. आगरी कोळी समाजाने गौराई पूजनाची परंपरा खंडित न करता साधेपणाने उत्सव साजरा केला. पूर्वी गौरी गणपतीच्या महिनाभर आधी गावातील महिला अंगणात येऊन गौरी गणपतीची आणि बायांची गाणी गात ढोलकीच्या तालावर फेर धरला. आता घरातच लेकी सुनांनी गाण्यांची रेकॉर्डिंग लावून फेर धरला. यावेळी सर्व कुटुंबातील महिला आणि पुरुष एकाच रंगाचा पोशाख घालत असतात.
गौरी आवाहनाचा दिवस म्हणजे घरात नवचैतन्याचे वातावरण निर्माण होते. मातीच्या गौराईची प्रतिष्ठापना करुन पूजेत तेरड्याला विशेष मान असतो. याच तेरड्याला गौराईचा भाऊ म्हणून मुखवटा घालून सजवले जाते. त्याला गौराईचा भाऊ शमरोबा म्हणून संबोधले जाते. गौरी आवाहनाच्या दिवशी घरातील सुवासिनी नवीन सुपात गौराईची पाथरी घेऊन येतात. त्यामध्ये तेरडा, गोकलाची फूल रानटी भेंडीची फूल महत्वाची मानले जाते. गौरी पूजनाच्या दिवशी नऊ प्रकारच्या भाज्या, भाकरी, पोळ्या, खीर, वडे, जिलेबी, लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळी, मिठाई आदी पदार्थ नैवद्य रुकवंतीसाठी ठेवले जातात.
गौराईची साडी चोळी हिरव्या बांगड्यानी ओटी भरली जाते. रात्री बारा वाजता गौराईची आरती केली जाते त्यांनतर गौराई माहेरवाशिणीचे खेळ रंगतात.
गणरायाच्या सजावटीसाठी शाळावर्गाची हुबेहूब प्रतिकृती; माजी विद्यार्थ्यांची भन्नाट आयडिया#GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #Ganeshotsav2021 #गणेशोत्सव https://t.co/mAgUCOiFsH
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 13, 2021
संबंधित बातम्या :
Ganesh Visarjan | पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, 173 ठिकाणी कृत्रिम तलाव
Ganeshotsav 2021 | गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’चं का बरं म्हणतात? वाचा या मागची कथा…